हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या गेल्या आठवड्यात डबल एव्हिक्शन झालं आणि याचा मोठा धक्का स्पर्धकांना लागला. अचानक घरातील दोन सदस्यांनी शोचा निरोप घेतला. यामध्ये आधी विकास सावंत आणि त्यानंतर अमृता देशमुख घराबाहेर पडली. विकासाच्या एव्हिक्शनवर सगळेच भावुक झाले अगदी मांजरेकरांच्याही डोळ्यात पाणी आलं. तर अमृताच्या एव्हिक्शनने सगळ्यांना धक्का दिला अगदी तिला स्वतःलासुद्धा. या धक्क्यातून ती अजूनही सावरलेली नाही असं ती स्वतःच म्हणतेय.सलग नॉमिनेट होऊनही घरात शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकून राहिलेली अमृता अचानक बाहेर पडली आणि निरोपक्षणी ढसाढसा रडली. यानंतर तिने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री अमृता देशमुखने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर हि पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिलं आहे कि, ‘बिग बॉस मराठीच्या या टप्प्यावर बाहेर पडले आहे. या दु:खातून मी अद्याप बाहेर पडले नाही. थोडक्यात ऑल इज नॉट वेल… काय चूक काय बरोबर…कोण फेअर, कोण अनफेअर हे तपासणे तेव्हाही सुरू होतं आणि आत्ताही सुरू आहे. पण तुमच्या प्रेमामुळे आतमध्ये असताना मला ऊर्जा मिळत होती आणि त्याच गोष्टीमुळे आतासुद्धा मिळत आहे. आता कमेंट करत सकारात्मकता दिलीत तर सगळं ऑल इज वेल वाटेल…आभार’. यानंतर एक व्हिडीओ शेअर करत तिने घरातील आठवणी काही चांगल्या काही वाईट शेअर केल्या. यावेळी तिला तिचं एव्हिक्शन अनपेक्षित असल्याचं तिनं सांगितलं. अजूनही हा धक्का ती पचवू शकलेली नसली तरी खेळ आहे तो आणि त्यामुळे शो मस्ट गो ऑन.
अमृताची हि पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमृताच्या एव्हिक्शनचा सगळ्यांनाचं मोठा धक्का लागला होता. काही आठवडे काहीच परफॉर्मन्स नसलेली अमृता अलीकडेच फॉर्ममध्ये आली होती. त्यामुळे चाहते तिला टॉप ५ मध्ये पाहू लागले होते आणि इतक्यातच तिचा या घरातील प्रवास थांबला. पण चाहत्यांसाठी तीच या सिजनची विजेती ठरली आहे. अमृताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर,अमृता देशमुखने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘फ्रेशर्स’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. तर ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटातून तिने अफलातून पात्र साकारले. याशिवाय ती पुण्यात रेडिओ जॉकी अर्थात RJ म्हणून काम करते. पुण्याची टॉकरवडी म्हणून ती लोकप्रिय आहे.
Discussion about this post