Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अमृता फडणवीस म्हणतायत ‘वो तेरे प्यार का गम!’; ट्विट करीत दिले नव्या गाण्याचे संकेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Amruta Fadanvis
0
SHARES
39
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. तस चर्चेत असण्यासाठी त्यांच्याकडे बरीच कारणं आहेत. पण मनोरंजनाच्या दृष्टीने पाहता त्या आपल्या गायकीमुळे प्रसिद्ध आहेत. विविध झोनची गाणी गाणे हा त्यांचा छंद आहे आणि हा छंद त्या जोपासताना दिसतात. अनेकदा त्यांच्या गाण्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. पण थांबतील त्या अमृता फडणवीस थोडीच. सामाजिक उपक्रम असो किंवा मग एखादा सांस्कृतिक कार्यक्रम अमृता नेहमीच आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवतात. इतकेच काय तर आपल्या गायकीची प्रतिभा देखील दर्शवतात. त्यांचे चाहते देखील खूप आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. जी चर्चेत राहिलीच शिवाय लोकप्रिय देखील ठरली. यानंतर आता आणखी एक गाणं घेऊन आपण येणार आहोत असे काहीसे संकेत अमृता यांनी ट्विट मधून दिले आहेत.

लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना….
लफ़्ज़ नए है ,
पर रंग वही सुहाना …… !

Thank you @saregamaglobal

Coming up ….#goldenmelody #recreation #Mukesh pic.twitter.com/fH8fhuDVY1

— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 15, 2022

अमृता फडणवीस यांनी अधिकृत सोशल मीडिया ट्विटर हँडलवर ट्वीट करत या गाण्याचं पोस्टर शेअर केलंय. ‘वो तेरे प्यार का गम’ असे या गाण्याचे बोल आहे. या पोस्टरसोबत अमृता यांनी ट्वीट करीत लिहिले आहे की, ‘लेकर आ रही हूँ एक यादगार गीत पुराना. लफ़्ज़ नए है, पर रंग वही सुहाना! थँक यू सारेगामा ग्लोबल , कमिंग अप!’. हे ट्विट पाहून अमृता फडणवीस यांचे चाहते एकदम खुश झाले आहेत. अनेकांनी या ट्विटवर अभिनंदनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या गाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही म्हंटले आहे. याआधी सुद्धा अमृता फडणवीस यांच्या गाण्यांचे विविध कलाकारांसोबत अल्बम आले आहेत. अगदी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन ते लोकप्रिय गायक सोनू निगम यांच्या सोबत अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिभा दर्शवली आहे.

अमृता फडणवीस या नेहमीच विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन करताना दिसतात. त्यांच्या अनेक गाण्यांचे अल्बम्स लोकांनी डोक्यावर उचलून घेतले आहेत. यामध्ये शिवतांडव नृत्य, तेरी बन जाऊंगी अकॉस्टिक, ये नयन डरे डरे, तेरी मेरी फिरसे, मोरया रे, बेटिया प्राईड ऑफ नेशन, सड्डी गल्ली रेल गड्डी, कुणी म्हणाले, अंधार, तिला जगूद्या, पेटूनी उठू दे आज एक अशा अनेक गाण्यांचा समावेश आहे. अमृता फडणवीस या केवळ गायिका म्हणून प्रसिद्ध नाहीत तर चालू राजकीय घडामोडींवर देखील त्या आपले मत ठामपणे मांडताना दिसतात. ज्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास नेहमीच दिसून येतो. तूर्तास तरी त्यांचे चाहते आगामी गाण्याची वाट पाहत असून हे गाणे लवकरच प्रदर्शित होईल अशी आशा आहे.

Tags: Amruta FadanvisTwitter PostUpcoming Songviral postViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group