Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘झलक दिखला जा’च्या 10’व्या पर्वात चंद्रमुखी अवतरणार; फर्स्ट लूक आउट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 31, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jhalak Dikhala Ja
0
SHARES
24
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तो चांद राती तेजाळताना… हे प्राण माझे ओवाळताना.. अशा सुमधुर संगीत लाभलेल्या एकाहून एक अव्वल गाण्यांची पर्वणी असलेल्या चंद्रमुखी चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. चित्रपटातील मुख्य भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे दिसले आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी मराठी मनावरचं नव्हे तर बॉलिवूडवरही छाप पडल्याचे दिसले. हा चित्रपट २९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला पण अजूनही हा चर्चेचा विषय आहे. यानंतर आता आगामी झलक दिखला जा या डान्सिंग रिऍलिटी शोच्या १० व्या वारंवार स्वतः अमृता खानविलकर स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

ज्या ‘चंद्रा’ने अख्खा महाराष्ट्र नाचवला तीच चंद्रा आज प्रेक्षकांच्या भेटीला स्पर्धक म्हणून येते आहे. अमृता स्वतः एक अतिशय उत्तम अभिनेत्री तर आहेच. त्यासोबत ती एक उत्तम नृत्यांगना आहे हे आपण जाणतोच. पती हिमांशुसोबत अमृताने नच बलियेचा ७ वा सीजन जिंकला होता. यानंतर अमृता विविध भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आली. यात कधी वाजले कि बारा म्हणत तिने जल्लोष भरला तर कधी बाई गं.. कसं करमत नाही गं म्हणत प्रेम भावनांना वेग आणला. यानंतर आता कलर्स हिंदी वरील ‘झलक दिखला जा’ या शो मध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. त्यामुळे हे पर्व अतिशय विशेष असणार आहे.

https://www.instagram.com/p/CgqoZKOLiwD/?utm_source=ig_web_copy_link

‘झलक दिखला जा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शो आहे. २००६ साली हा शो सुरु झाला आणि लोकप्रियतेच्या एका वेगळ्याच शिखरापर्यंत पोहोचला. काही कारणास्तव या शोचे गेल्या पाच वर्षांत एकही पर्व झाले नाही. मात्र आता मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा ‘कलर्स’वर हा शो येतोय. याची एक झलक नुकतीच सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. ‘झलक दिखला जा’चे हे १० वे पर्व अत्यंत विशेष आहे. कारण यामध्ये स्पर्धक म्हणून सेलेब्रिटी कलाकार सहभागी होत आहेत.

https://www.instagram.com/p/CgmGjhAPmOF/?utm_source=ig_web_copy_link

माहितीनुसार अभिनेत्री अमृता खानविलकरव्यतिरिक्त ‘बिस बॉस ११’ची विजेती शिल्पा शिंदे, श्रद्धा आर्यादेखील यामध्ये सहभागी होणार आहे. तर अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि निर्माता करण जोहर हे परीक्षक असणार आहेत. तर शोचं होस्टिंग कॉमेडी क्वीन भारती सिंग करताना दिसणार आहे. त्यामुळे एकंदरच हा सीजन फुल्ल धमाल आणि मस्ती घेऊन येतोय.

Tags: Colors HindiDancing Reality ShowInstagram PostJhalak Dikhhla Javiral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group