हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वरील जवळपास सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. पण ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेने अगदी कमी वेळात प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. केवळ कथानकाने नव्हे तर मालिकेतील इतर सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनाला हात घातला आहे. मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट पाहताना प्रेक्षक एन्जॉय करता आहेत. आनंदी, राघव, रमा, चिंगी आणि राघवची आई सुलक्षणा, तसेच त्याची बहीण वर्षा ही सगळी पात्र प्रेकांच्या मनावर रुंजी घालण्यात यशस्वी झाली आहेत. अशातच आता या मालिकेत एक अतिशय नाजूक असा कौटुंबिक विषय हाताळला जात आहे. ज्याबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
लग्न होऊन कर्णिकांची सून, राघवची दुसरी बायको आणि चिंगीची सावत्र आई अशी आनंदीची नाती जुळली. पण तिने मनाने आणि आपल्या वागणुकीने हि सगळी नाती सख्ख्याहून जास्त आपलीशी केली. सावत्र आई म्हणजे वाईट हा विचार समाजातून काढून फेकणारी हि मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. आनंदीची नणंद वर्षा रोज घरी येते, दंगा करते, बडबडते, कधी कधी तर आनंदीचा जाचसुद्धा करते. पण गेले काही दिवस ती चिंतेत आहे आणि हे आनंदीच्या लक्षात आलंय. वर्षाच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडतंय याची आनंदीला कुणकुण लागली आहे. त्यामुळे आनंदी वर्षाचा विस्कटलेला संसार सुरळीत करण्यासाठी तिला मदत करू इच्छिते.
पण वर्षाचा संसार विस्कटलाय कि मोडलाय..? असा प्रश्न उभा करणारा आजचा एपिसोड असेल. वर्षाचा नवरा अतुल आजपर्यंत हे पात्र दाखविले नव्हते. वर्षाच्या वागणुकीतून तिचा नवरा चांगला आणि तिच्यावर प्रेम करणारा असेल असे चित्र उभे केले होते. पण गेल्या काही भागांपासून समजतंय कि वर्षा माहेरी शेर असली तरी सासरी तिची मांजर होते. वर्षाचा नवरा तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ करत आहे. काही प्रसंगावरून तो तिला मारहाण करत असेल असेही चित्र स्पष्ट आहे. आजच्या भागात कर्णिकांचा जावई त्यांच्या घरी जेवायला येईल. यावेळी आनंदी रमाच्या मदतीने त्याचं पितळ उघड पडू शकेल..? हे पाहण्यासाठी आजचा भाग पहा. पण आनंदीला आज जर सत्य समजलं नाही तर..? वर्षा या जाचातून सूट शकेल का नाही..? यासाठी पुढील भाग नक्की पहा.
Discussion about this post