Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘डोळ्यावर चष्मा, अंगावर आकर्षक नक्षीचा सदरा..’; ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील अंकुशचा नवा लूक चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 20, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Maharashtra Shahir
0
SHARES
46
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाने सोशल मीडिया अक्षरशः व्यापलं आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण अगदी चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळा उत्साह आणि जल्लोष पहायला मिळत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे, हा चित्रपट सह्याद्रीचा सिंह.. जना मनातला आवाज.. आणि मातीतला अस्सल लोककलावंत स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांची जीवनगाथा आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी हि भूमिका साकारत असून नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाले आहे. ज्याने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

शाहीर साबळे यांची भूमिका अंकुश चौधरी साकारणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत आधीच फार चर्चा सुरु आहे. अशातच अंकुशने नव्या लूकमधील नवे पोस्टर शेअर केल्यानंतर प्रेक्षकांचे लक्ष आणखीच वेधले गेले आहे. यामध्ये अंकुशच्या डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा, आकर्षक नक्षी असलेला पांढऱ्या रंगाचा सदरा आणि समोर गाण्यासाठी माईक असून तो गाण्याच्या पोझमध्ये दिसत आहे. शाहीर साबळेंच्या भूमिकेतील अंकुशचा हा लूक अतिशय दमदार दिसतो आहे. हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

महाराष्ट्र शाहीरच्या या नवीन पोस्टरवर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देत पोस्टर आवडल्याने म्हटले आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा पहिला वहिला टिझर आज २० मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात शाहीर साबळेंची पत्नी भानुमती साबळे यांच्या भूमिकेत केदार शिंदेंची लेक सना शिंदे दिसणार आहे. तसेच एक मोठी अपडेट अशी कि, चित्रपटात लता मंगेशकरांची भूमिका देखील आहे आणि या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे दिसणार आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही वाच्यता करण्यात आली नसून केदार शिंदेंकडून कमालीची गुप्तता पाळली गेली आहे.

Tags: Ankush ChoudhariInstagram PostMaharashtra ShahirMarathi upcoming movieSana ShindeViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group