हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल २ वर्षानंतर चित्रपटगृहे खुली झाल्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदाला काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आता प्रत्येक विकेंड कसा आरारा..खतरनाक एन्जॉय करायला मिळतोय. त्यात चित्रपट गृहे खुली झाल्यापासून एकापेक्षा एक हटके चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे चित्रपट जणू मनोरंजनाची पर्वणीच म्हणावे लागतील. यातच आता आदित्य सरपोतदार दिग्दर्शक पहिला वहीला झोंबी चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे ‘झोंबिवली’. हा प्रयोगशील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील एक झोंबीमय गाणं अलीकडेच प्रदर्शित झालं असून अवघ्या आठवड्याभरातच या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे.
मुख्य म्हणजे या गाण्यामध्ये मराठी लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव झोंबीच्या रूपात दिसतोय. त्यामुळे चाहत्यांनी देखील पाहताना भुवया उंचावल्या आहेत. या गाण्यात इतकी भन्नाट मजा आणि कहर आहे कि गाणं ऐकताच कुणाचेही पाय थिरकत. त्यात सिद्धार्थ जाधवचा अफलातून झोंबी लूक आणि चित्रपटही मुख्य कलाकारांची कल्ला करणारी एनर्जी भन्नाट आहे. या गाण्यात सिद्धार्थचा झोंबी लुक सर्वांसाठी लक्षवेधक ठरला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर या झोंबीमय गाण्याचा कहर झाला आहे. ‘अंगात आलया’ असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन रंजू वर्गिस यांनी केलं आहे. गाण्याचे बोल प्रशांत मदपूवर याने लिहिले आहेत. तर रोहन रोहन यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. मुख्य म्हणजे स्वतः रोहन प्रधान यानेचे हे गाणं गायलं आहे.
झोंबिवली हा चित्रपट येत्या वर्षात ३० एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून हा मराठीतील पहिला झोंबी चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेता अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत दिसतील. तर अभिनेता सिद्धार्थ जाधवने अंगात आलया गाण्यात बाहेर आणली आहे. या गाण्याला काही दिवसांत २ मिलियन व्ह्यूज , २.५ लाखांहून अधिक लाईक मिळालेले आहेत. प्रेक्षकांनीही या गाण्याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. या गाण्याविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणाला कि, ‘सिद्धार्थ माझ्या गेल्या तिन्ही चित्रपटांत दिसलाय. तो नेहमीच माझ्यासोबत कलाकृतीत एक लकी चार्म असल्यासारखा असतो. या चित्रपटातील हे गाणं त्याच्यासाठी खास लिहिल्यासारखं वाटतं, कारण त्याची ती सकारात्मकता आणि अफाट ऊर्जा. त्याच्या असण्यातच सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे. हे गाणं चित्रपटात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सिद्धार्थला मी विचारल्यावर त्याचा लगेच होकार येणंही तितकंच महत्त्वाचं होतं. त्याने साकारलेला झोंबी डान्सर हा खरंच स्पेशल आहे.’
Discussion about this post