हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला गेला. या निमित्त सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून या दिवसाचे महत्व सांगितले गेले. दरम्यान अनेक सेलिब्रिटी मंडळींनी देखील या दिवसाचे औचित्य साधून खास पोस्ट शेअर केल्या होत्या. कलाकारांनी आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून चाहत्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये अभिनेते अनिल कपूर यांच्यादेखील पोस्टचा समावेश आहे. मात्र या स्टोरीमध्ये त्यांनी दिवंगत अमराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
‘मराठी भाषा गौरव दिन’ यानिमित्त अभिनेता अनिल कपूर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये त्यांनी काम केलेल्या मराठी चित्रपटाच्या आठवणीला त्यांनी उजाळा दिला आहे. अभिनेते अनिल कपूर हे ‘हमाल दे धमाल’ या एकमेव मराठी चित्रपटामध्ये काम करताना दिसले आहेत. त्यांनी या चित्रपटात मराठी सिनेविश्वातील राजा माणूस दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्यामुळे या चित्रपटाची आठवण शेअर करताना आपसुनकच ते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणीत भावूक झाले. हि स्टोरी शेअर करताना त्यांनी लक्षासोबतचा एक फोटो शेअर केला होता.
या फोटोसोबत अनिल कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते कि, ‘महाराष्ट्रातील सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने मला एक आठवण आली ती म्हणजे ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाची. हा माझा आजवरचा पहिलाच मराठी चित्रपट. माझं भाग्य आहे की मला या चित्रपटात काम करायला मिळालं. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा त्याच्या कारकीर्दीतल्या बेस्ट परफॉर्मन्सपैकी हा एक आहे. माझा मित्र लक्ष्मीकांत.. मला त्याची रोज आठवण येते.. आजही त्याची कमी जाणवते’.
अनिल कपूर यांची हि स्टोरी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलांनी म्हणजेच अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे यांनीदेखील शेअर केली आहे. सोबतच अनिल कपूर यांचे आभार मानले आहेत.
Discussion about this post