हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर यांची ख्याती संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये आहे. अनेको लोकांचा लाडका लखन आजही तितकाच लोकप्रिय आहे. यामुळे चित्रपटांमध्ये भले ते फार दिसत नसतील पण चाहत्यांच्या मनात त्यांची आजही जागा कायम आहे. परिणामी लोक अनिल त्यांच्या खाजगी आयुष्यात काय करत आहेत? याबाबत नेहमी उत्सुक असतात. पण यावेळी काहीशी चिंताजनक बाब असून चाहतेही काळजी व्यक्त करीत आहेत. कारण अनिल जर्मनीमध्ये असून या दौऱ्यातील शेवटचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनिल कपूर यांनी आपल्या आजारपणाबाबत माहिती देत त्यावरील उपचाराचा शेवटचा दिवस असल्याचे सांगत आहेत. यानंतर ते डॉक्टरांना भेटणार आहेत असेही त्यांनी सांगितले. या व्हिडीओमुळे चाहत्यांची धाकधूक मात्र चांगलीच वाढली.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये अनिल कपूर काळा कोट घातलेला दिसत आहेत. तर काळी टोपी आणि काळी पँट घातलेली दिसत आहे. नेहमीप्रमाणे ते हँडसम दिसत आहेत. पण त्यांच्या व्हिडीओने मात्र चाहत्यांची हवा काढली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अनिल कपूर यांनी लिहिले की, बर्फावर एक परफेक्ट वॉक. जर्मनीतील शेवटचा दिवस. माझ्या शेवटच्या उपचारासाठी मी डॉ. मुलरला भेटणार आहे. त्याला आणि त्याच्या जादुई स्पर्शाबद्दल धन्यवाद. यात अनिल सुंदर बर्फवृष्टी दरम्यान जर्मनीच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. पण अनिल कपूरने जर्मनीला उपचारासाठी गेल्याचा खुलासा करणे लोकांसाठी त्रासदायक ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार अनिल कपूर हे गेल्या १० वर्षांपासून अकिलीस टेंडिनाइटिसने या आजाराने ग्रस्त आहेत. हा आजार आपल्या पायाच्या टाचांशी संबंधित असून यामध्ये असह्य वेदना होतात. सोशल मीडिया पोस्टमध्ये अनिल कपूर यांनी लिहिले होते की, डॉ. हॅन्स-विल्हेम मुलर-वोल्फाहर्ट यांच्या मदतीने कोणतीही शस्त्रक्रिया न करता तो या स्थितीतून बरा झाला. तर या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, “मी १० वर्षांहून अधिक काळ ऍचिलीस टेंडनच्या समस्येने त्रस्त होतो. जगभरातील डॉक्टरांनी मला सांगितले होते की शस्त्रक्रिया हाच माझा एकमेव पर्याय आहे. डॉ. म्युलर, टवटवीत उपचारांच्या मालिकेद्वारे, मला लंगडत चालण्यापासून ते शेवटी धावण्यापर्यंत नेले. कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय.”
Discussion about this post