हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता अंकुश चौधरी सध्या चांगलाच चर्चेत आहे. अलीकडेच त्याचा ‘दगडी चाळ २’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. यानंतर आता उत्सुकता आहे ती ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची. या चित्रपटाचे वेध संपूर्ण सिनेसृष्टीला लागले आहे. कारण या चित्रपटात महाराष्ट्राचे शाहीर अनुभवता येणार आहेत. हा चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचे आजोबा म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु होऊ घातले आहे. याआधी चित्रपट संहितेचे पूजन देखील करण्यात आले. या चित्रपटाच्या संहितेला देवदेवतांचे आशीर्वाद लाभावे यासाठी संपूर्ण टीमने अष्टविनायक यात्रा देखील केली होती. यावेळी आलेला अनुभव सांगताना अंकुश चौधरीने एक पोस्ट शेअर शेअर केली आहे.
अभिनेता अंकुश चौधरीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आयुष्यात कलाकार म्हणून लोकांसमोर पहिल्यांदा परफॉर्मन्स केला तो ह्याच गाण्यावर.. शाहीर साबळे ह्यांच्या महाराष्ट्राची लोकधारा ह्या कार्यक्रमात.. त्या सुरुवातीच्या काळात शाहीर साबळे म्हणजे आमचे सगळ्यांचे ‘बाबा’….आमच्यासाठी आदर्श होते.. आयुष्यात त्यांच्या सारखं बनायचं,असा विचार करताना कधी हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की, एक दिवस त्यांचीच भूमिका पडद्यावर पार पाडायचं भाग्य मिळेल.. हे शिवधनुष्य पेलण्यासाठी बळ मिळाव म्हणून आमच्या सिनेमाच्या महाराष्ट्र शाहीरच्या संहितेने खास अष्टविनायकाची यात्रा केली.. आज गणेश चतुर्थी निमित्त त्यातलीच काही क्षणचित्रे तुमच्या सोबत शेअर करतोय..बाप्पाचा, बाबांचा आणि तुम्हा मायबाप रसिकांचा आशिर्वाद असाच आमच्या पाठीशी राहु दे..गणपती बाप्पा मोरया!!!! महाराष्ट्र शाहीर.. २८ एप्रिल २०२३ रोजी सिनेमागृहात..’
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लोककला आणि लोककलेचा वारसा जपणाऱ्या लोककलावंतांचा चित्रपट आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये केले जाणार आहे. हा चित्रपट आगामी पिढीला कोण होते शाहीर…? हा प्रश्न पडण्याआधीच उत्तर माहित असावे म्हणून तयार केला जात आहे. आजही शाहीर साबळे यांचा लोककलेचा वारसा दिग्दर्शक आणि त्यांचे नातू केदार शिंदे अविरत चालवत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून ते आपल्या आजोबांच्या जीवनावरील पडदा उघडण्यास सज्ज आहेत. या चित्रपटात शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार असून त्याचा फर्स्ट लूक प्रेक्षकांचा प्रचंड भावला होता.
Discussion about this post