हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| एकीकडे राज्याचे राजकारण पुरते ढवळून निघाले असताना एखाद्या नेत्याचं इंडस्ट्रीत येण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याची बातमी समोर येणे थोडे बाचकवणारे आहे. पण जे आहे ते आहेच. हि बातमी आहे एका आगामी चित्रपटाच्या घोषणेची. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आघाडीचे नेते आणि महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. मुख्य म्हणजे जितेंद्र आव्हाड हे स्वतः या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत आणि हे त्यांचे स्वप्न असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एक स्वप्न साकार होत आहे.
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करून सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत,लोकराजाची कथा
"शाहू छत्रपती".
सहा भाषांमध्ये भव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर २०२३मध्ये.@ShahuFilm@thevarrun pic.twitter.com/79Xf34PUtu— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2022
कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया ट्वीटर हॅण्डलवरून एक ट्विट करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. यात त्यांनी लिहिलं आहे कि, ‘एक स्वप्न साकार होत आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राच्या भूमीला वंदन करुन सिनेमाच्या रुपात घेऊन येत आहोत, लोकराजाची कथा. ‘शाहू छत्रपती’. सहा भाषांमध्ये भव्य स्वरुपात मोठ्या पडद्यावर २०२३ मध्ये’. या ऐतिहासिक चित्रपटाची कथा हि डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिली आहे. तर स्वतः जितेंद्र आव्हाड यांची प्रस्तुती आहे. हा सिनेमा ६ भाषांमध्ये रिलीज केला जातोय हे या चित्रपटाचे विशेष आहे. हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे सांगितलं जात आहे.
आव्हाड यांनी आज छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त देखील एक ट्विट केले आहे. “आम्ही फक्त परंपरेचे राजे, बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे” असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्ती वरून मिरवणूक काढणारे, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारीराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!
"आम्ही फक्त परंपरेचे राजे, बाबासाहेब तुम्ही तर ज्ञानाचे राजे" असे म्हणत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हत्ती वरून मिरवणूक काढणारे, आरक्षणाचे जनक, लोककल्याणकारीराजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा..!#xh pic.twitter.com/pC7ZHl0F2D
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 26, 2022
सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या काही काळापासून अनेक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शिवरायांचा जाज्वल्य इतिहास हा तरुणाईपुढे मोठ्या मेहनतीने उभा करीत आहेत. कारण आपल्या महाराष्ट्राला श्रीमंत इतिहासाची परंपरा आहे आणि हि परंपरा राखणे आपली जबाबदारी. त्यामुळे गेल्या काही दिवसांत ‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शेर शिवराय’ अशा अनेक ऐतिहासिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. त्यामुळे आता ‘शाहू छत्रपती’ या चित्रपटाची घोषणा लोकांसाठु उत्सुकतेचे कारण बनली आहे. त्यातच जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट प्रस्तुत केल्यामुळे लोकांमध्ये वेगळीच उत्कंठता निर्माण झाली आहे.
Discussion about this post