हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून महाराष्ट्राचं राजकारण किती मलीन आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. कारण महाराष्ट्रातील राजकारणात रोज काही ना काही कुरघोड्या उघड उघड चालू आहेत. दरम्यान भगवा कोणाचा.. धनुष्यबाण कोणाचा अशा विषयांनी तर सगळं राजकारण ढवळून काढलं आहे. यातच शशिकांत पवार प्रोडक्शन प्रस्तूत आगामी ‘बेभान’ या चित्रपटाची प्रचंड चर्चा रंगली आहे. अलीकडेच याचा टीझर लाँच करण्यात आला होता. ज्यामध्ये ‘भगव्याला अख्खा महाराष्ट्र विसरायला लागलाय’ असे विधान आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमकं काय कथानक घेऊन येतोय याबाबत प्रचंड चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पहिली तर सामान्य नागरिकांचे हाल निश्चित आहेत हे काही वेगळे संज्ञालक नको. कारण एक सामान्य नागरिक सोबत आणि निषेध ठरायचं असेल तर काय आणि कसा ठरवणार..? कुणी मर्मावर बोलतंय, कुणी धर्मावर बोलतंय तर कुणी कर्मावर बोलतंय. मग अशावेळी महाराष्ट्र खरंच भगव्याला विसरलाय का.? प्रश्न पडणे साहजिक आहे. त्यामुळे हे विधान नक्की कोणाच्या बाजूने असाही एक प्रश्न पडतोच.. बेभान या चित्रपटात नक्की कोण भगव्याला विसरलं आहे.. ? हा चित्रपट सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर आहे का..? असे बरेच प्रश्न एकावेळी निर्माण करतो आहे.
View this post on Instagram
‘झाला बोभाटा’, ‘भिरकीट’ या चित्रपटांनंतर दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी ‘बेभान’ हा चित्रपट का केला असेल..? याचे उत्तर तर जगदाळेच देऊ शकतात. पण मिळालेल्या माहितीनुसार, ‘बेभान’ हा चित्रपट दिनेश देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. मंगेश कांगणे यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत आणि ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते ठाकूर अनुपसिंग हे मराठीत याच चित्रपटातून पदार्पण करत आहेत. ठाकूर अनुपसिंगसह अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, संस्कृती बालगुडे, स्मिता जयकर आणि संजय खापरे यांच्यादेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
Discussion about this post