हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मनोरंजन विश्वाला गेल्या चार दिवसातील हा तिसरा मोठा धक्का लागला आहे. अलीकडेच अभिनेता आदित्य सिंग राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ‘साराभाई वर्सेस साराभाई’ मालिका फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले. अशातच आता अभिनेता नितेश पांडे यांनी वयाच्या ५१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. नितेश पांडे यांचा मृतदेह इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये आढळला. प्रथमदर्शनी मृत्यूचे कारण हार्ट अटॅक वाटत आहे. मात्र पोलीस तपास सुरू असून पोस्ट मॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. सध्या हॉटेल कर्मचारी आणि त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी केली जात आहे.
TV actor Nitesh Pandey found dead at a hotel in Igatpuri, Nashik in Maharashtra. Prima facie, the cause of death seems to be a heart attack. A Police team present at the hotel and investigation is underway. Postmortem report is awaited. Questioning of hotel staff and people close… pic.twitter.com/UIEnosnZMo
— ANI (@ANI) May 24, 2023
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध टीव्ही अभिनेते नितेश पांडे यांचे २३ मे २०२३ रोजी रात्री हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनवार्तेने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. लेखक सिद्धार्थ नागर यांनी नितेश पांडे यांचे निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत फेसबुकवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. एका वृत्त संस्थेशी बोलतांना सिद्धार्थ नागर यांनी सांगितले की, ‘हे खरं आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथून परत येत असताना मला नितेश यांच्या निधनाबद्दल समजलं. नितेश शुटिंगसाठी मुंबईबाहेर नाशिकच्या इगतपुरीला गेले होते आणि तिथेचं त्यांना रात्री १: ३० वाजण्याच्या सुमारास हार्ट अटॅक आला’.
अभिनेता नितेश पांडे यांच्याकडे टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणून पहिले जायचे. आजतागायत त्यांनी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्येदेखील विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘ओम शांती ओम’, ‘बधाई हो’, ‘रंगून’, ‘हंटर’, ‘दबंग २’, ‘बाजी’, ‘मेरे यार की शादी है’, ‘मदारी’ आणि ‘खोसला का घोसला’ यांसारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातुन नितेश पांडे यांनी आपली अभिनय कारकीर्द गाजवली आहे. तर ‘तेजस’, ‘साया’, ‘मंजिलें अपनी अपनी’, ‘जुस्तजू’, ‘हम लड़कियां’, ‘सुनैना’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘महाराजा की जय हो’, ‘हीरो- गायब मोड ऑन’ त्याबरोबरच दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ या मालिकेतही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. सध्या ते ‘अनुपमा’ मालिकेत धीरज कपूर या भूमिकेत दिसत होते.
Discussion about this post