Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अनुष्का यशला ओळखणार का..?; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत उत्कंठावर्धक वळण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 16, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
143
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका प्रचंड चर्चेत आहे. मालिकेतील एका हृदयद्रावक वळणानंतर चौधरी कुटुंबाची शांतता हरपली. नेहा, परी आणि यशच्या अपघातात नेहा बेपत्ता झाली. यानंतर नेहाचा मृत्यू झाला असे मानून चौधरी जगू लागले. चिमुकली परी आणि यश नेहाशिवाय कासावीस होत जगण्याच्या प्रयत्नात दाखवले. हे दृश्य पाहून अनेकदा प्रेक्षकांचीही मन फार दुःखी झाले. अशातच परिचय आयुष्यात डान्स टीचर म्हणून रेवती आणि दुसरीकडे नेहाच्या चेहऱ्यासारखी हुबेहूब अनुष्काची एंट्री झाली. सगळ्यांनी हि अनुष्का म्हणजेच नेहा आहे अशा कमेंट्सचा वर्षाव केला. यानंतर आता अनुष्का आणि यश आमने सामने आले आहेत. हा प्रोमो अत्यंत व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

एकीकडे चौधरी कुटुंबात सिम्मी काकू सगळे निर्णय घेताना यश आणि परीच्याही आयुष्याचा निर्णय घेते आहे. रेवतीला यशसाठी मागणी घालून तिने तिचा होकार मिळवला आहे. तर दुसरीकडे यशची भेट अनुष्कासोबत होते. एका जमिनीच्या ऑक्शनसाठी चौधरी ग्रुप आणि मेहता ग्रुप एकमेकांसमोर कांटे कि टक्कर देताना दिसतात. यावेळी अनुष्काचा भाऊ अर्थात रितेश भाई यशसमोर ऑक्शन लढवीत असतो. आता कोणत्याही क्षणी आपल्याला माघार घ्यावी लागणार अशी स्थिती असताना तिथे अनुष्का येते आणि शेवटची बोली लावते.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तिला पाहून यशला मोठा धक्का लागतो. आपली नेहा परत आली असे त्याला वाटते आणि तो तिच्याकडे पाहतंच राहतो. क्षणांतच त्याच भान हरपतं. चौधरी ऑक्शन हरतात मात्र यशच्या मनात सगळं काही परत मिळाल्याची भावना निर्माण होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये तो अनुष्काला आपण यश असल्याचे सांगताना दिसतो. मात्र गाडीत बसलेली अनुष्का सुन्न चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत राहते. तर रितेश ड्रायव्हरला गाडी पुढे घ्यायला सांगतो आणि कासावीस झालेला यश गाडीमागे धावण्याचा प्रयत्न करतो. हा प्रोमो पाहताना अनेक प्रेक्षकांनी यशला नेहा मिळूदे अशी प्रार्थना केली आहे. आता येत्या भागांमध्ये अनुष्का कि नेहा हे तर कळेलच.. शिवाय रेवतीचं पुढे काय होणार..? हा एक मोठा प्रश्न सुटेल कि आणखी गुंता वाढेल..? हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

Tags: Instagram PostMazi Tuzi ReshimgathViral PromoViral Videozee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group