हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सीजन सुरु झाला कि सगळ्यांना उत्सुकता असते ती चावडीची. गेल्या शनिवारी आणि रविवारी बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनची पहिली चावडी रंगली. या पहिल्याच चावडीला महेश मांजरेकर यांचा पारा भलताच चढल्याचे पहायला मिळाले. याचे कारणही तसेच होते.
बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री केल्यापासून स्पर्धक अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांनी भांडणाचा पहिला शंख फुंकला. तेव्हापासून घरात रोज नवीन भांडण सुरूच आहेत. मुख्य म्हणजे यामध्ये आवर्जून एकतर अपूर्वा असते नाहीतर मग प्रसाद. अखेर मांजरेकरांनी दोघांची चांगली खरडपट्टी केली आणि त्यांना ताळ्यावर येण्याचा सल्ला दिला.
या गेल्या आठवडयात बिग बॉस मराठीचे स्पर्धक अपूर्वा नेमळेकर आणि प्रसाद जवादे यांच्यात सतत चांगलेच वादावाद होताना दिसले. या सगळ्या वादविवादावर महेश मांजरेकर यांनी शनिवारी चावडीच्या पहिल्याच दिवशी चांगला तळपता प्रकाश टाकला. मुख्य म्हणजे फक्त ते दोघेच नाही तर सर्वच स्पर्धकांच्या चुकांवर ते आवर्जून बोलले. पण अपूर्वा आणि प्रसाद यांच्यावर ते चांगलेच संतापल्याचे दिसून आले. दरम्यान अपूर्वाचा आवाज आणि प्रसादचं वर्तन यावरून मांजरेकरांनी दोघांचेही कान पिळले.
या स्पर्धकांवर निशाणा साधताना शोचे होस्ट मद्देश मांजरेकर म्हणाले कि, ‘बिग बॉसचं घर आठवडाभर वाजलं ते फक्त अपूर्वा नेमळेकरमुळे वाजलं. तू सगळ्यांना सांगते आवाज खाली आवाज खाली करा.. असच सांगते ना. मुळात सर्वात जास्त ओरडत तूच होतीस.’ मांजरेकरांच्या या वक्तव्यानंतर प्रसाद जवादे ‘मुळात प्रोब्लेम हाच आहे की…’, असं म्हणतोच. इतक्यात महेश मांजरेकर ‘जवादे तुझी बाजू घेत नाहीये मी. मध्ये मध्ये तोंड खुपसायचं नाही’, असं म्हणत त्याला चांगलाच झापतात. अपूर्वा आणि प्रसाद शिवाय मांजरेकरांनी घरात अनेकांची शाळा घेतली. प्रसादला जाणीवपूर्वक कामाला लावले जाते का यावरही चर्चा झाली. जे सदस्य इतरांच्या सांगण्यावर स्वतःचे निर्णय घेत आहेत त्यांनाही आरसा दाखवला.
Discussion about this post