हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। उद्या २ ऑक्टोबर २०२२ रोजी अत्यंत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा ‘बिग बाॅस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौथ्या पर्वाचा ग्रँड प्रीमिअर आहे. उद्या या कार्यक्रमात नक्की कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत याची अधिकृत माहिती सगळ्यांनाच मिळेल. पण त्याआधी प्रेक्षकांची उत्सुकता वाढविणासाठी कलर्स मराठी वाहिनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही प्रोमो व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये काही बोल्ड डान्स आहेत तर काही लक्षवेधी अदाकारी. यामध्ये एक स्पर्धक नृत्य करताना दिसत आहे आणि ती शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर असल्याचे बोलले जात आहे.
सध्या बिग बॉस मराठी ४ च्या ग्रँड प्रीमियरचा बोलबाला सुरु आहे. त्याचे काही प्रोमो शेअर करण्यात आले असून हे व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोज एका स्पर्धकाचा प्रोमो वाहिनीकडून शेअर केला जातोय. यामध्ये स्पर्धकाचा चेहरा दिसत नाही. पण प्रेक्षक मात्र अंदाज लावत आहेत. कदाचित यातल्या काहींचे अंदाज अचूक असतील असे दिसत आहे. कारण असाच एक प्रोमो समोर आल्यानंतर हि अभिनेत्री कोण असा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. पण काही नेटकऱ्यांनी मात्र अपूर्वा नेमळेकरच्या नावाची पाटी वर केली आहे. ‘बिग बॉस च्या घरात थिरकली.. लाखो दिलाची धडकन’ असा या व्हिडिओला व्हॉईस ओवर देण्यात आला आहे आणि ही स्पर्धक गंगुबाई चित्रपटातील ‘ढोलीडा’ गाण्यावर थिरकताना दिसतेय.
सध्या या प्रोमोने सोशल मीडियावर चांगलीच जादू केली आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली गेली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाणारी ही अभिनेत्री नेमकी कोण आहे..? यावर अनेक तर्क लावले जात आहेत. पण काहींनी मात्र अचूक नेम साधत बिग बॉसच्या घरात जाणारी ही अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आहे असे म्हटले आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणजेच ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शेवंता. तिच्या या पात्रावर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केले आहे. पण निर्मात्यांशी झालेल्या वादामुळे तिने मालिका सोडली. त्यामुळे अपूर्वा बिग बॉसची स्पर्धक असूच शकते. तुम्हाला काय वाटत..?
Discussion about this post