Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आरस्पानी सौंदर्य, धारदार नजर आणि करारी बाणा’; ‘रावरंभा’मध्ये अपूर्वा साकारतेय ‘शाहीन आपा’ची भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 7, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Apurva Nemlekar
0
SHARES
93
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून शेवंता हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. विविध भूमिकांमधून ती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनमध्येही अपूर्वा चांगली चर्चेत राहिली.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

यानंतर आता अनुप जगदाळे दिग्दर्शित आगामी मराठी ऐतिहासिक चित्रपट ‘रावरंभा’मध्ये अपूर्वा एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून आपल्या भेटीस येत आहे. तिच्या या भूमिकेचे नाव ‘शाहीन आपा’ असे आहे. या भूमिकेतील तिचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मीडियावर वायरल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

आपल्या या नव्याकोऱ्या भूमिकेचा फर्स्ट लूक शेअर करत अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आतापर्यंत माझ्या वेगवेगळ्या भूमिकांवर तुम्ही अतोनात प्रेम केलंय. अशीच एक वेगळी भूमिका आता मी साकारली आहे. “शाहीन आपा” येतेय येत्या १२ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटातून..’ अपूर्वाचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आरस्पानी सौंदर्य, धारदार नजर आणि करारी बाण्याची ‘शाहीन आपा’ साकारत अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाली आहे. ‘रावरंभा हे इतिहासातील ‘मोरपंखी पान’ येत्या १२ मे २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर उलघडणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

अपूर्वा साकारत असलेली ‘शाहीन आपा’ हि छत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी अशी अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना अपूर्वा नेमळेकर म्हणाली कि, ‘ऐतिहासिक चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:ला ही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे’. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. तर छायांकन संजय जाधव आणि संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिमति अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आणि गुरु ठाकूर, क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे.

Tags: Apurva NemlekarInstagram PostMarathi Historical MovieRavrambhaUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group