हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हि सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. या अभिनेत्रीने झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून एक वेगळीच ओळख मिळवली. अपूर्वाला विविध पेहराव करणे, वेशभूषा साकारणे अत्यंत आवडते. गेल्या नवरात्रीमध्ये तिने नऊ दिवस विविध देवीची रूपं साकारली होती आणि तिचे हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.यानंतर आता अपूर्वाने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भगवान विष्णूचा आठवा अवतार अर्थात लाडक्या श्रीकृष्णाचा पेहराव केला आहे. या लूकमधील हे फोटोशूट तिने चाहत्यांसह शेअर केलं आहे.
श्रीकृष्ण जगातील असंख्य भक्तांचं दैवत आणि स्त्रियांचा बंधू आहे. यामुळे श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन होणारे अमाप आहेत. त्याचा सावळा रंग, मोहक हास्य आणि त्याच्या लीला सगळं कसं मन व्यापणारं आहे.
त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमी हा दिवस अत्यंत खास आहे. म्हणून अपूर्वाने श्रीकृष्णाचा अवतार धारण करीत फोटोशूट केले आहे. यासोबत तिने एक खास कॅप्शन लिहिले आहे. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माच्या आधीपासूनच त्याचे शत्रू त्याला मारण्यासाठी टपून बसलेले होते. परंतु श्रीकृष्णाने मात्र सर्व संकटांवर मात करून श्रावण कृष्ण अष्टमीला मध्यरात्री जन्म घेतला. हाच दिवस आपण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो.’
पुढे लिहिले आहे कि, ‘जी व्यक्ती धर्म, सत्य व न्यायाच्या बाजूने आहे केवळ तीच व्यक्ती योग्य आहे असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. महाभारत काळापासून आजपर्यंत युद्धात ज्याप्रमाणे कपट होते त्याला सरळमार्गाने उत्तर देता येत नाही.
अशावेळी जशास तसेच उत्तर द्यावे लागते. नाठाळाच्या माथी काठीच हाणावी लागते. कपटी माणसाला त्याच्याच भाषेत उत्तर दिले तरच तो वठणीवर येतो. यासाठी कृष्णनीतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपल्या ध्येयापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने ज्ञान देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच त्या केशवाचे चरणी प्रार्थना आहे.
श्रीकृष्णाच्या उपदेशांनी तुमचे जीवन उजळून निघावे..’ २ वर्षांनंतर यंदा गोकुळ अष्टमी आणि दहीकाला मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी बालगोपाळांची गर्दी दिसून येत आहे.
Discussion about this post