हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फक्त आणि फक्त २ दिवस उरले आहेत बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता कोण होणार ..? या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जो तो केवळ रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३च्या संध्याकाळची वाट पाहत आहे. कारण याच दिवशी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. गेल्या ९८ दिवसात या स्पर्धकांनी जीव तोडून खेळ खेळला आणि आता फक्त काहीच क्षण बाकी आहेत. अशातच स्पर्धक अपूर्वा नेमळेकरच्या चाहत्यांनी तिच्या विजयासाठी चांगलीच कंबर कसली आहे असे दिसून आले आहे.
त्याच झालं असं कि, येत्या २ दिवसात बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात बिग बॉस मराठीची ट्रॉफी विजेत्याला दिली जाणार आहे. सोळा स्पर्धकांसोबत सुरु झालेला हा प्रवास आता टॉप टॉप पाच स्पर्धकांपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे आता स्पर्धा अटीतटीची आहे.
या खेळात पहिल्या दिवसापासून अपूर्वा नेमळेकर ही स्ट्रॉंग स्पर्धक असल्याचे दिसत आहे आणि त्यामुळे तिचे चाहते तिच्या विजयासाठी शक्कल लढवताना दिसत आहे. अपूर्वासाठी तिचे चाहते अगदी मुंबईभर बॅनर, पोस्टर लावत आहेत. इतकेच काय तर रस्त्यावर उतरून नाक्या नाक्यांवर उभे आहेत ‘अपूर्वाला भरगोस मतांनी विजयी करा’ अशी विनंती करत आहेत. यांपैकी काही चाहत्यांचे फोटो आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची स्ट्रॉंग स्पर्धक अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने तिकीट टू फिनाले जिंकून थेट शेवटच्या आठवड्यात झेप घेतली आणि एक पाऊल ट्रॉफीच्या दिशेने पुढे चालली. या खेळासाठी ती पहिल्या दिवसापासून भिडताना दिसत आहे. जे काही प्रसंग आले, टास्क आले त्याला अपूर्वा नडली, भिडली आवाज उठवला पण थांबली नाही. कधी चुकली, कधी भांडली, कधी रडली पण लढली. त्यामुळे अपूर्वाने या खेळात विजय मिळवावा असे तिच्या चाहत्यांना वाटणे साहजिक आहे. म्हणूनच तिचे चाहते तिच्या समर्थानात शक्य ते सगळं काही करताना दिसत आहेत.
Discussion about this post