Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Live कॉन्सर्टदरम्यान गायक अरिजित सिंगला दुखापत; चाहत्यांचा अतिउत्साह पडला महागात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 9, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Arijit Singh
0
SHARES
513
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड संगीत विश्वातील लोकप्रिय गायक अरिजित सिंग आपल्या सुमधुर आवाजातील गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. अरिजित सिंगने गायलेलं प्रत्येक गाणं मनाचा ठाव घेत. तरुणांसाठी अरिजित सिंग तर सिंगिंग स्टार आहे. ठिकठिकाणी विविध इव्हेन्ट, कॉन्सर्टमध्ये अरिजित त्याच्या गायकीची छाप पडताना दिसतो. त्याला पहायला आणि ऐकायला लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण अनेकदा चाहते आपले भान हरपून जातात आणि आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला दुखावून बसतात. अशीच एक घटना अरिजित सिंगसोबत देखील घडली आहे.

A female audience pulls Arijit's hand during a live concert in #Aurangabad.#ArijitSingh #music #Bollywood #ArijitSinghLive pic.twitter.com/NPSiwyPnbk

— Arijit Singh Fan (@SinghfanArijit) May 8, 2023

मीडिया रिपोर्टनुसार, कॉन्सर्टदरम्यान अरिजित सिंग प्रेक्षकांशी संवाद साधत होता. यावेळी एका महिलेने अरिजित सिंगसोबत जबरदस्ती हात मिळवण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी तिने गायकाचा हात खेचला. रविवारी औरंगाबाद येथे गायक अरिजित सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. याच कॉन्सर्ट दरम्यान हि घटना घडली. उत्साहाच्या भरात चाहतीने अरिजीतचा हात खेचल्याने त्याचा हात दुखावला गेला आहे. यानंतर अरिजितने हात खेचणाऱ्या महिलेसोबत संवाद साधला आणि आपला संयम ढळू न देता तिला तिची चूक सांगितली. या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देतानाचा त्या महिलेच्या वागणुकीवर संताप व्यक्त करत आहेत.

Dada got injured in #Aurangabad concert. Please behave good to a artist like him, performing 4 hrs straight without break for audience. Be kind & enjoy the #Music…#ArijitSingh #ArijitSinghLive #Bollywood pic.twitter.com/34OIyszY9R

— Arijit Singh Fan (@SinghfanArijit) May 8, 2023

या व्हिडिओमध्ये अरिजित म्हणतोय, ‘तुम्ही मला खेचत होता. प्लीज स्टेजवर या. ऐका, मी स्ट्रगल करत आहे, ठीक आहे..? तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल’. यावेळी चाहत्याने काही उत्तर दिल्यानंतर अरिजित पुढे म्हणाला, ‘तुम्ही इथे मजा करायला आला आहात. काही हरकत नाही. पण जर मला परफॉर्म करता येत नसेल, तर तुम्हाला मजा करता येणार नाही, हे तितकेच सोपे आहे. तुम्ही मला असे खेचले आहे आणि आता माझे हात थरथरत आहेत. मी कॉन्सर्ट सोडू का..?’ अरिजीतच्या या प्रश्नावर जमावाने ‘नो’ अर्थत ‘नाही’ असा आवाज दिला. यावर अरिजित म्हणाला, ‘तुम्ही मला असे का ओढले? माझा हात सध्या थरथरत आहे. मी माझा हात हलवू शकत नाहीये’.

Tags: Arijit SinghBollywood SingerInjuredTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group