Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मलायकासोबत लग्नाचा अजूनतरी विचार नाही..; केजो’च्या प्रश्नावर अर्जुन कपूरचं उत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Koffee With Karan 7
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा अत्यंत लोकप्रिय आणि बहुचर्चित टॉक शो ‘कॉफी विथ करण’चा ७ वा सीजन सुरु आहे. आतापर्यंत या शोचे सहा एपिसोड पूर्ण झाले असून येत्या सातव्या आणि नव्या एपिसोडमध्ये अभिनेता अर्जुन कपूर आणि सोनम कपूर आपल्याला पहायला मिळणार आहेत. यावेळी अर्जुनला मलायकासोबतच्या नात्याबद्दल आणि भविष्यात लग्न करण्याविषयी करणने प्रश्न विचारला. यावर अर्जुनने दिलेलं उत्तर ऐकून त्याचे आणि मलायकाचे चाहते अवाक झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

करण जोहरच्या या कॉफी विथ करण नावाच्या टॉक शोमध्ये सेलिब्रिटींना त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत प्रश्न विचारले जातात. यात फॅमिली, रिलेशनशिप, अफेअर, डिवोर्स, फ्रेंडशिप आणि अजून बऱ्याच खाजगी विषयांवर बोट ठेवलं जात. यावेळी अर्जुन कपूर शोमध्ये आल्यामुळे त्याच्या आणि मलायकाच्या नात्याविषयी बरेच प्रश्न विचारले गेले. मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर करत करणने चांगली बॅटिंग केली. मलायकासोबतचं नातं जगजाहीर करण्याचं कधी ठरवलं..? कोणाकोणाला त्याबद्दल माहिती होती..? लग्नाबद्दल काय विचार आहेत..? असे प्रश्न अर्जुनला त्याने विचारले.

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

यावर उत्तर देताना अर्जुन म्हणाला कि, ‘मलायकाशी इतक्यात लग्न करण्याचा माझा कोणताच विचार नाही. कारण सध्या मी करिअरवर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे.. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास लॉकडाऊनमध्ये गेलेली दोन वर्षं, कोरोना महामारी आणि त्यामुळे बदललेल्या गोष्टी कारणीभूत आहेत. मला माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

तसाही मी एक अत्यंत वास्तववादी व्यक्ती आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही. मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. मला खरोखर व्यावसायिकदृष्ट्या थोडं अधिक स्थिर व्हायला आवडेल. मी आर्थिकदृष्ट्या बोलत नाही, मी भावनिकदृष्ट्या या गोष्टींचा विचार करत आहे. मला असं काम करायला आवडेल ज्यातून मला आनंद मिळेल.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

कारण मी स्वत: आनंदी असल्यास, माझ्या जोडीदारालाही मी आनंदी ठेवू शकेन. मी सुखी जीवन जगू शकतो आणि मला वाटतं की माझा बराचसा आनंद हा मला माझ्या कामातून येतो.’

View this post on Instagram

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

कॉफी विथ करणचा हा एपिसोड आज गुरुवारी डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित झाला आहे. यावेळी शोमध्ये अर्जुनसोबत त्याची चुलत बहीण आणि अभिनेत्री सोनम कपूरसुद्धा उपस्थित होती. या शो मध्ये बरेच खाजगी प्रश्न विचारले जातात. याआधी देखील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये येऊन गेले आहेत. अक्षय कुमार, समंथा रूथ प्रभू, आमिर खान, करीना कपूर, विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि अजून काही कलाकार गेल्या भागांमध्ये दिसले होते. सध्या करणचा हा शो एकदम जोरात चालू आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

Tags: Arjun Kapoorcoffee with karanInstagram PostKaran joharMalaika AroraSonam KapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group