हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकवर्ग बॉलिवूड चित्रपट आणि बॉलिवूड कलाकारांवर भयंकर नाराज असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बॉलिवूडकरांवर ‘Boycott’चं ग्रहण घिरट्या घालतंय. सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ‘Boycott’ ट्रेंडमूळे आपटला. इतकेच काय तर अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट देखील फारसा चालला नाही. यामुळे बॉयकॉट प्रकरण बॉलिवूडकरांच्या पाय देताना दिसत आहे. यातच अर्जुन कपूरने बॉयकॉट ट्रेंडिंगवर आपला संताप व्यक्त करत प्रेक्षकांना ऐकवले आहे.
एका मुलाखतीत अर्जुन कपूरनं आपला संताप व्यक्त केला आहे. सध्या कोणत्या ना कोणत्या कारणांमूळे बॉलिवूडचे चित्रपट बॉयकॉट केले जात आहेत. यासाठी सोशल मीडियावर एक वेगळीच मोहिम सुरू केली जाते आणि याचा परिणाम चित्रपटांच्या कमाईवर होतोय. म्हणून आता यावर गप्प बसून चालणार नाही, असं अर्जुन कपूर म्हणाला. पुढे म्हणाला कि, नेटकऱ्यांकडून कोणतंही कारण नसताना चित्रपटांवर बहिष्कार टाकला जातोय. ही भूमिका आता एक वेगळ्याच वळणावर जात आहे. हे नेमकं का होतंय, कोण करतंय हे कळतही नाही. पण जे लोक हे करत आहेत त्यांना वेळीच थांबवणं गरजेचं आहे. त्यांना आत्ताच धडा शिकवला गेला पाहिजे.
पुढे म्हणाला कि, आम्ही शांत बसलोय म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेऊ नका. बहिष्कार टाकणाऱ्या किंवा ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना अद्दल घडवायला वेळ लागणार नाही. त्यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अभिनेता अर्जुन कपूरच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी बॉलिवूडकरांवर आणखीच नाराज झाल्याचे दिसत आहे. आता तर बॉयकॉट बॉलिवूड असा हॅशटॅग सोशल मीडियावर वेगाने ट्रेंड होतो आहे. त्यामुळे आता बॉलिवूडकरांच्या अडचणी आणखीच वाढणार असे दिसत आहे.
Discussion about this post