हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारं बोलिवूडचं ट्रेंडिंग कपलं म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. सध्या हे जोडपं कधी लग्न करतंय याची चाहते वाट पाहत आहेत. अलीकडे त्यांच्या लग्नाची तयारी सुरु असल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. यातच आता गेल्या दोन चार दिवसांपासून मलायका गरोदर असल्याच्या बातम्या वेगाने पसरू लागल्या आहेत. या चर्चा इतक्या वाढल्या कि अखेर अभिनेता अर्जुन कपूरने याविषयी अधिकृत भाष्य केले आहे. इंस्टावर स्टोरी शेअर करून हि बातमी खोटी असल्याचे सांगत त्याने संताप व्यक्त केला आहे. तर अर्जुनची पोस्ट स्टोरीवर शेअर करत मलायकाने देखील आपला राग व्यक्त केला आहे.
‘पिंकविला’ या वृत्तपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मलायका अरोरा गरोदर आहे आणि लवकरच ती अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. मलायका आणि अर्जुन ऑक्टोबर महिन्यात लंडन ट्रिपला गेले होते. या दरम्यान ही गुड न्यूज त्यांनी आपल्या नातेवाईकांना दिली असल्याची माहिती या पोर्टलने दिली होती.
ज्यामुळे विविध माध्यमांमध्ये मलायकाच्या प्रेग्नेंसीबाबत चर्चा होऊ लागल्या. इतकेच काय तर त्यांचे चाहते सोशल मीडियावर याबाबत गॉसिप करू लागले आणि अखेर अर्जुनने या बातम्यांवर प्रकाश टाकला आहे. या बातम्या तथ्यहीन असल्याचे सांगत त्याने माध्यमांवर संताप व्यक्त केला आहे.
अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा गरोदर असल्याच्या बातम्यांवर होणारी चर्चा आणि ट्रोलिंग पाहून अभिनेत्याने यावर मौन सोडले. यावेळी त्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत हे वृत्त खोटं असल्याची माहिती दिली आहे. त्याने यात लिहिलं आहे कि, ‘या बातम्या तथ्यहीन आणि असंवेदशील आहेत. आमच्याबाबीत सतत अशा प्रकारच्या बातम्या आर्टिकल्समधून येत आहेत ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत आणि त्यामुळे तुम्ही हे वारंवार करत आहात. हे योग्य नाही. आमच्या खासगी आयुष्याशी कोणी खेळ करण्याची हिंमतही करू नका’.
Discussion about this post