हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसच्या मराठी सिजनचे चौथे पर्व अंतिम टप्प्यात आले आहे. या घरात सहभागी झालेल्या १४ स्पर्धकांपैकी एक एक घरातून बाहेर होत या खेळातून बाद होत गेले. बिग बॉस मराठीचे शेवटचे २ आठबावडे राहिले असताना. या घातली उरलेल्या सदस्यांनी ८० दिवसांचा टप्पा मोठ्या मुश्कीलने पूर्ण केला आहे. यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात फॅमिली वीक आला ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी स्पर्धकच नाही तर प्रेक्षकही भावुक झाले. बिग बॉस मराठीच्या घरात आता जेमतेम ७ स्पर्धक उरले आहेत. यामध्य अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, राखी सावंत आणि आरोह वेलणकर हे स्पर्धक आहेत.
राखी आणि आरोह बिग बॉसच्या खेळात उशिरा सहभागी झाले. पण याआधी अपूर्वा, अक्षय, किरण, अमृता आणि प्रसाद पहिल्या दिवसापासून या घराचा भाग राहिले आहेत. आपल्या कुटुंबापासून लांब, नात्यांपासून लांब त्यांच्या सहवासापासून लांब असलेले हे स्पर्धक त्यांच्या कुटुंबाच्या आठवणीत अनेकदा भावुक होताना आपण पाहिले. बिग बॉसनेही पाहिले आणि म्हणून हा फॅमिली वीक प्रत्येक सिजनमध्ये डिझाईन केलेला असतो.
यावेळी स्पर्धकांचे कुटुंबीय, नातलग. मित्र मैत्रिणी त्यांच्या अगदी जवळचे कुणीतरी त्यांना भेटायला येत असतात. या सिजनमध्ये चालू फॅमिली वीकसाठी आतापर्यंत अपूर्वाची आई, अक्षयची आई आणि बहीण, अमृताचे आई- बाबा, किरणची पत्नी तर आरोहची आई, पत्नी आणि मुलगा येऊन गेले आहेत.
अजूनतरी प्रसाद आणि राखीसाठी कुणी घरात एंटर केलेलं नाही. राखीने तर माझ्यासाठी कुणी येणार नाही.. म्हणत आपल्या भावना आधीच व्यक्त केल्या आहेत. ज्यामुळे तिचे चाहते भावुक होत तिच्यासाठी कुणीतरी या असे म्हणत आहेत. तर आतापर्यंत येऊन गेलेल्या कुटुंबीयांपैकी आरोहच्या मुलाचा भाबडेपणा सगळ्यांच्या मनाला प्रचंड भिडला. त्याची बाबा हि हाक आरोहाच्या काळजाला भेदत होती.
बाबा आय मिस यु.. आपल्या बोबड्या स्वरात आरोहाच्या लेकाने त्याला त्याच्या बाबाची आठवण येत असल्याचं म्हटलं. अखेर निरोपाची वेळ आली आणि आता त्याला बाबाचा हात सोडून परत जायचं होत. यावेळी आरोहचा जीव अगदीच कासावीस झाला होता. त्याचा लेक घरातून बाहेर पडताना ए बाबा.. ये ना.. म्हणत होता आणि रडत होता. हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून प्रेक्षकही भावुक झाल्याचे दिसले आहे. हा भाग आपल्याला आज पहायला मिळेल.
Discussion about this post