हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| गेल्या १० दिवसांत राज्याच्या राजकारणात इतके काही होऊन गेले की जणू एखादी नाटिका सुरू होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर या सत्ता नाट्यात आपली ताकद दाखवत मुख्यमंत्री पदाला हादरा दिला आहे. बुधवारी २९ जून २०२२ रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद गेले अडीज वर्ष ज्यांनी बखुबी निभावले त्या उद्धव ठाकरेंनी अखेर राजीनामा दिला. मुख्य म्हणजे यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर तसूभर देखील दुःख नव्हते यासाठी अनेकांनी त्यांचे कौतुक केले. अनेकांचा उर भरून आला. याबाबत गेल्या कित्येक दिवसांपासून जो तो आपले मत मांडताना दिसत होता. यामध्ये सर्वात जास्त प्रकाश झोतात आला तो म्हणजे आरोह वेलणकर. याहीवेळी त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.
People of #Maharashtra have won! 🇮🇳
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर सामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा सत्तासंघर्ष सुरू असताना अभिनेता आरोह वेलणकर याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर ट्वीट केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्राची जनता जिंकली’. हे ट्वीट केल्यानंतर त्याला अनेकांनी पाठिंबा दिलाय तर बऱ्याच जणांनी त्याला ट्रोल देखील केलं आहे. याशिवाय आरोहने आणखी एक ट्वीट केलं आहे. ४५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रानं असाच एक सत्तासंघर्ष पाहिला होता. त्याचा संदर्भ देत आरोहनं हे दुसर ट्वीट केलंय. ‘जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं’, असं यात त्याने म्हटलं आहे.
Karma! जे साहेबांनी केलं तेच त्यांच्या सरकार सोबत झालं…🇮🇳 pic.twitter.com/qsDUdCNtOn
— Aroh Welankar (@ArohWelankar) June 29, 2022
अभिनेता आरोह वेलणकरने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणी आरोहच्या ट्विटचे समर्थन करीत आहे. तर कुणी आरोहला त्याच्या ट्विटसाठी ट्रोल करीत आहे. अनेकांनी आपला पाठिंबा उद्धव ठाकरे यांना दिला आहे. कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामासाठी जनतेला हाच आपला मुख्यमंत्री असावा असे वाटत आहे. मात्र माझ्याच माणसांनी मला दगा दिला असे भावुक वक्तव्य करीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाला रामराम करीत निरोप घेतला.
Discussion about this post