Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अर्शी जोडणार होती अफगाणिस्तानशी साता जन्माचं नातं; तालिबान्यांचा हैदोस पाहून उडाली घाबरगुंडी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 23, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि सध्या अफगाणिस्तानची अवस्था काय आणि कशी आहे. बघता बघता होत्याच नव्हतं झालं आणि सगळं काही उद्ध्वस्त झालं. जगावं कि मरावं असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अद्याप अफगाणिस्तानची अवस्था बिकटच आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळविला असून आपल्या दहशतीने संपूर्ण देश त्यांनी उध्वस्त केला आहे. तालिबान्यांच्या हैदोसामुळं तेथील नागरिक अक्षरशः भीतीच्या छायेखाली जगत आहेत. शिवाय ज्या लोकांचे अफगाणिस्तानशी संबंध आहेत, ते देखील कित्येक कारणाने चिंतेत आहेत. जसे कि अर्शी खान.. हि अभिनेत्री लवकरच अफगाणिस्तानच्या क्रिकेटरपटूसोबत साताजन्माची गाठ बांधणार होती. मात्र तालिबान्यांची दहशत आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती पाहून ती चांगलीच घाबरली आहे. त्यामुळे तिची एंगेजमेन्ट रद्द करावी लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस फेम अर्शी खान लवकरच अफगाणिस्तानसोबत एका वेगळ्या नात्यात बांधली जाणार होती. अर्थात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूशी ती जश्न ए शादी म्हणजेच लग्न करणार होती. पण तिथली एकंदर परिस्थिती पाहून ती चांगलीच तंतरली आहे. त्यामुळे या संदर्भात बोलताना अभिनेत्री अर्शी खान म्हणाली की, ‘माझ्या वडिलांनी निवडलेल्या एका अफगाण क्रिकेटपटूशी मी लवकरच लग्न होणार होते. पण आता मला भीती वाटते की तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा मिळाल्यामुळे माझ्या कुटुंबाला ही एंगेजमेंट किंबहुना हे नातेच पुढे जाऊन रद्द करावे लागेल’.

View this post on Instagram

A post shared by ARSHI KHAN AK (@arshikofficial)

पुढे म्हणाली कि, मी माझ्या भावी मंगेतरच्या संपर्कात आहे. तो माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. आम्ही आता अगदी मित्र मैत्रिणीप्रमाणे बोलत आहोत. कारण, आता मला खात्री आहे की माझे आई वडील माझ्यासाठी भारतीय जोडीदार शोधतील.” असे सांगून अर्शी खानने हे नाते इथेच संपल्याची माहिती दिली आहे. इतकेच नव्हे तर अर्शी खानने इतर माहिती देताना सांगितले कि, माझ्या कुटुंबाची मुळे अफगाणिस्तानात आहेत. कारण “मी एक अफगाण पठाण आहे, आणि माझे कुटुंब युसूफझाई वंशीय गटातील आहे. माझे आजोबा अफगाणिस्तानातून स्थलांतरित झाले होते आणि भोपाळमध्ये जेलर होते. त्यामुळे माझी मुळे अफगाणिस्तानात आहेत, पण मी माझ्या आई- वडील आणि आजी- आजोबांप्रमाणेच एक भारतीय नागरिक आहे.
अर्शीनं त्या क्रिकेटपटूचं नाव जाहीर करण्यास नकार दिला आहे.

Tags: Afganistan Crisisarshi khanBigg Boss FameBreak Tie With AfganistanTaliban Terror
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group