हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक झाली होती हे आपण सारेच जाणतो. कारण हे प्रकरण संपूर्ण देशभरात आणि सोशल मीडियावर प्रचंड गाजलं. मात्र काही दिवसांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज होते याबाबत पुरावे सापडले नसल्याच NCB ने सांगितलं आणि त्याला क्लिनचिट देण्यात आली. यानंतर आर्यन आपले आयुष्य पूर्ववत जगू लागला आहे. परंतु या प्रकरणी आर्यन खानची निर्दोष मुक्तता होणे या निर्णयाला हिंदू महासंघाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे, अॅड. सुबोध पाठक (पालघर) यांनी आज पुण्यात या प्रकरणाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ॲड सुबोध पाठक म्हणाले कि, ‘आर्यन खानला घटनास्थळी मुंबई अमली पदार्थ विभागाने रंगेहात पकडले होते. त्याचप्रमाणे आर्यन खान यानेही गुन्हा मान्य असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी मान्यही केलं होतं. त्याचा आधारावर सत्र न्यायालयाने दोन वेळा त्याचा जामीन नाकारला होता मात्र तपास यंत्रणांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन आर्यन खान आणि त्याच्या सहकाऱ्यांना सबळ पुरावा नसल्याचे कारण देत त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.’
‘या प्रकरणी पोलिसांकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत की नाही ते न्यायालयात खटल्या दरम्यान टिकणार की नाही ही बाब ठरविण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र आरोपींना निर्दोष मुक्त करून न्यायालयाच्या अधिकारावर पोलिसांनी अतिक्रमण केले आहे.’ या घटनेविरोधात हिंदू महासंघाने १३ जुलै २०२२ रोजी कोर्टात आव्हान दिले असून या संपूर्ण प्रक्रियेत तपास यंत्रणा गाफिल राहिल्या आणि त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन या सर्व आरोपीना मदत केली, हे मुद्दे उपस्थित केले आहेत.’ याप्रकरणी तब्बल ३६ पानांची कागदपत्रे कोर्टात दाखल करण्यात आली असून आर्यन खानच्या अडचणी आता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
Discussion about this post