हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतलं. दरम्यान आतापर्यंत एनसीबीने आर्यनसह अन्य ९ जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील कलमांपैकी २०(बी) या कलमात १० वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. दरम्यान आज दुपारी किला कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आणि आता कोर्टाने आर्यांची कोठडी ७ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे.
Cruise ship party case | Mumbai's Esplanade Court sends Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha to NCB custody till 7th October pic.twitter.com/mU8wP06Jt4
— ANI (@ANI) October 4, 2021
आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा यांना न्यायालयात हजर केलं होत. त्यामुळे कोर्टात केलेल्या पुराव्यांच्या आधारावर NCBने आर्यांची कोठडी वाढवून मागितली असता कोर्टाने शाहरुखच्या लेकाला कोणताही दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आता आर्यनची रवानगी NCB च्या कोठडीत होत आहे. तसेच आर्यन खान सह आणखी तिघांची नसिबा च्या कोठडीत पाठवणी होत आहे.
Cruise ship party case | ASG says accused Aryan Khan had gone to the ship on invitation, he was present there among people who've been apprehended with drugs. There are chats between you & others about drugs. So there must be a thorough investigation of all these things, he says.
— ANI (@ANI) October 4, 2021
‘आर्यनच्या फोनमधील चॅटमध्ये काही कोडनेम आढळून आले आणि त्याच्या अडचणी वाढल्या. त्यांचा उलगडा करण्यासाठी त्याची कोठडी वाढवून मागितली असल्यामुळे या कोठडीत वाढ झाली आहे. मोबाईलमध्ये सापडलेल्या लिंक्स आणि त्यामागचं रॅकेट उघडून प्रकाशझोतात आणण्यासाठी कोठडी गरजेची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. ड्रग्ज तस्करांशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपत्तीजनक चॅट करण्यात आलं आहे, हे कोर्टासमोर उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातही छापेमारी सुरू आहे,’ अशी माहिती सिंह यांनी न्यायालयाला दिली. आर्यनच्या चॅटमधून पैशांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले असून बँक व्यवहारांसाठी रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचा उल्लेखही या चॅटमध्ये असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं.
एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह अन्य ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं होत. या सगळ्यांवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गंत कलम २० बी, ८(सी)२७ आणि ३५ सह अन्य कलम लावण्यात आले आहेत. तसेच २०(बी) कलमांतर्गंत जो कोणी या कायद्याचे उल्लंघन करतो त्याला शिक्षा होते. अर्थात मादक पदार्थांची आंतरराज्यीय आयात- निर्यात केल्यास संबंधिताला १० वर्षांची शिक्षा आणि १ लाख रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
Discussion about this post