हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत उच्चांक गाठताना दिसते आहे. मालिकेतील आई अर्थात अरुंधती तिच्या नव्या संसाराला लागली आहे. आशुतोषसोबत लग्न झाल्यानंतर अरुंधतीच्या आयुष्यात आलेला आनंद हा प्रेक्षकांनादेखील सुखावणारा आहे. यामुळे टीआरपी रेटिंग मध्ये ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे. अशातच अरुंधती आणि आशुतोषमध्ये फुलणाऱ्या नव्या नात्याचा अध्याय सुरू झाल्याचा एक रोमँटिक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतो आहे.
आतापर्यंत अरुंधतीला काय आवडतं..? असं कोणीच विचारलं नव्हतं. मात्र आशुतोषसोबत लग्न झाल्यानंतर तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाला तिला काय वाटतं..? याला महत्त्व दिल जात आहे. याशिवाय आशुतोष तिला प्रत्येक वेळी ती खास असल्याची जाणीव करून देतोय. नुकताच सोशल मीडियावर वायरल झालेला नवा प्रोमो पाहता अरुंधती आणि आशुतोष एका रोमँटिक डेटमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. खर तर आशुतोष हा मोठा व्यावसायिक आहे पण तरीही साधेपणाने आणि घरातल्या घरातच अरुंधतीसाठी त्याने सरप्राईज प्लॅन केले आहे. यावेळी त्याने घरात छान अशी फुलांची सजावट केली आहे. सोबतच रंगबेरंगी कँडल्सचा सौम्य प्रकाश आणि त्यासह स्पेशल डिनरचा आनंद!! हे संपूर्ण वातावरण प्रेमी युगलक एकमेकांसाठी भावना व्यक्त करताना करतात अगदी तसेच दाखवले आहे.
आशुतोष आणि अरुंधती यांच्या आयुष्यातील हे गोड क्षण त्यांची डिनर डेट अतिशय खास असणार आहे. कारण यावेळी आशुतोष अरुंधतीला कॉलेज पासूनच आपल्या मनात तिच्याबद्दल काय भावना रुंजी घालत होत्या हे सांगताना दिसणार आहे. तर अरुंधती आशुतोषच्या सरप्राईजचा तामझाम पाहून अगदी भारावून जाताना दिसणार आहे. ‘चित्रपटात दाखवले जाणारे असे दृश्य आवडत असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र असं कधीच पाहिले नाही’, ही खंत अरुंधती बोलून दाखवणार आहे. त्यामुळे दोघांच्याही नात्यातील मन मोकळेपणा येथे दिसून येईल. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून प्रेक्षकही या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Discussion about this post