हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि बहुचर्चित मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या एका वेगळ्याच मात्र उत्कंठावर्धक ट्रॅकवर सुरु आहे. या मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकारांनी नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेतील मुख्य पात्र अरुंधतीचा लेक अभिषेक याची पत्नी अनघा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेचे कथानक अनघाभोवती फिरते आहे. हि भूमिका मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने साकारली आहे आणि तिची एक इंस्टा पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे.
अभिनेत्री अश्विनीने महांगडे हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. यामुळे अनेकदा ती विविध पेहरावातील फोटो, विविध प्रोजेक्ट्सची माहिती या माध्यमातून देत असते. सध्या तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर तिने भरजरी शालूतील काही फोटो शेअर केले आहेत. सोबत अतिशय सुंदर आणि समर्पक कॅप्शन देत तिने या शालूमागील गोष्ट सांगितली आहे. या व्हायरल फोटोमध्ये अश्विनी लाल रंगाच्या भरजरी शालूमध्ये दिसत आहे. साडीतंही ग्लॅमर असतं हे तिला पाहून समजत. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘गोष्ट एका शालुची…. #ती च्या आनंदाची…. (किती सांभाळून ठेवतात न सगळ्याच शालुला ? आणि मुली जन्माला आल्या की किती कौतुकाने कधीतरी त्या मुलीलाही आईचा शालू नेसावा वाटतो…)’
अश्विनीने या फोटोमध्ये नेसलेला शालू हा मेकअप आर्टिस्ट दीपा यांच्या लग्नातील आहे. त्यामुळे त्यांच्या भावना अश्विनीने शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्विनीने लिहिलं आहे कि, ‘प्रत्येक साडीची तिची तिची एक गोष्ट असते. आणि जर लग्नातील “शालू” असेल तर मग… दीपा यांच्या लग्नातील २२ वर्षापूर्वीचा शालू… शालू दाखवताना त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. डोळे थोडे पाणावलेले…हजारो आठवणी त्या काही क्षणांत त्यांच्या डोळ्यासमोर आल्या असाव्या. शालूमध्ये असते आईची माया, दोन घरांना सामावून घेण्याची जबाबदारी असते’. अश्विनीने काही शब्दांत कित्येक महिलांच्या शालूमागील भावना व्यक्त केल्या आहेत आणि यामुळे तिची हि पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
Discussion about this post