Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

विरोध होणे स्वाभाविकच पण..; रानबाजार कलाकृतीला प्रेक्षकांना निर्विवाद पाठिंबा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ranbajar
0
SHARES
9
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| समाजातील काही बारीक सारीक गोष्टी वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडणे अत्यंत आवश्यक आहे. कारण समाजाची जी समज आणि भाषा आहे तीच समाजाला चांगली समजते. याच संदर्भात अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर ‘रानबाजार’ ही वेब सीरिज शुक्रवारी २० मे २०२२ रोजी रिलीज झाली आहे. यामध्ये बोल्ड आणि हॉट मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सोज्वळ सुंदर प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज बोल्ड असल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग झाले. पण आता प्रेक्षकांनीही या कलाकृतीला ग्रीन सिग्नल दिला आहे. शिवाय तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर यांनी टीकाकारांना चपराक लावणारी एक पोस्ट प्रेक्षकाने लिहिली होती तीच शेअर केली आहे आणि आपणही त्याचे कौतुक केले आहे.

View this post on Instagram

A post shared by jyoti chandekar (@jyoti.chandekar)

‘रानबाजार वेब सीरिजवर जे रान उठले आहे, त्यावरून लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. बोल्ड सीन आणि जरा भडक भाषेने इतके भेदरून जायचे मुळात कारण काय? ज्यांनी नामदेव ढसाळांचा गोलपिठा हा काव्यसंग्रह वाचला असेल, ज्यांना देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या स्थितीबद्दल नीट कल्पना असेल त्यांना रानबाजारसारख्या सीरियल अगदी मामुली वाटतील. त्यातील अभिनेत्रींनी जी काही कथित धाडसी दृश्ये दिली आहेत त्यापेक्षा अधिक उत्तेजक असे बरेच काही इंटरनेटवर सहजी उपलब्ध असते. आणि ते कोण कोण पाहाते याबद्दल बेधडकपणे लिहिले तर अनेकांची भारतीय संस्कृती लगेच डळमळीत होईल.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

रानबाजार वेब सिरीयल दिग्दर्शित करणारे, ती लिहिणारे तुमच्या आमच्यासारखेच चांगल्या घरातील आहेत आणि त्यात अभिनय करणारेही कोणी उठवळ नाहीत. रानबाजार ही एक कलाकृती आहे. त्याकडे तसेच पाहिले पाहिजे. उगाच अनेक लोक स्वतः आयुष्यात पाळत नसलेल्या मूल्यांचे समाज माध्यमावर स्तो माजवत बसतात तेंव्हा त्यांची शरम वाटते. जगात जे गलिच्छ असते असे मानले जाते ती आपल्याच समाजाची घाण असते. ती स्पष्टपणे दाखवणे यात काहीही चूक नाही. रानबाजार असे त्या मालिकेचे नाव असले तरी खरे नाव त्यामुळे प्रत्येकाच्या मनात येतेच. इथूनच त्या मालिकेच्या यशाला सुरूवात होते. समाजाचे सत्य न्यूड स्वरूपात दाखवणे सध्याच्या काळात तर आवश्यकच आहे. कारण नको त्या गोष्टी तकलादू मूल्यांच्या पदरात लपवून ठेवणाऱ्या लोकांना सध्या सोन्याचे दिवस आलेत. त्यामुळे रानबाजारला विरोध होणे स्वाभाविकच. पण या मालिकेला एक प्रेक्षक म्हणून माझा निर्विवाद पाठिंबा आहे,’ अशी पोस्ट समीर परांजपे यांनी लिहिली.

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

हीच पोस्ट शेअर करत ज्योती चांदेकर यांनी पुढे लिहिलं आहे की, ‘प्रिय समीर, मी तुम्हाला प्रत्यक्षात ओळखत नाही पण एक प्रेक्षक म्हणून आणि मुख्य म्हणजे एक आई म्हणून अगदी योग्य शब्दात तुम्ही माझ्या भावनांची मांडणी केलीत. धन्यवाद आणि आशिर्वाद. एक खरी आणि धाडसी वेब मालिका केल्याबद्दल एक मराठी रसिक प्रेक्षक म्हणन अभिजीत पानसे यांचे अभिनंदन!

Tags: Instagram PostJyoti ChandekarOTT PlatformPlanet MarathiRanbazartejaswini panditviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group