हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आधी पोस्टर, मग टिझर आणि ट्रेलर लॉन्च होताच ‘चौक’ चित्रपटाची तुफान चर्चा सुरु झाली आहे. २ मिनिट ३२ सेकंदाचा ‘चौक’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वेगवान कथानक, चटपटीत संवाद, दर्जेदार अभिनय आणि उत्तम पार्श्वसंगीत या सगळ्या समीकरणामुळे ‘चौक’च्या ट्रेलरची चर्चा सगळीकडे आहे, आणि यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला चौक, चौकातले उत्सव, चौकातलं राजकारण, चौकातली निखळ मैत्री, चौकात जुळलेलं प्रेम, चौकावर असलेला सोशल मीडियाचा प्रभाव, चौकाने बघितलेल्या पिढ्या आणि याच चौकाने बघितलेले वाद या सगळ्याची गोष्ट सांगणारा चित्रपट म्हणजे ‘चौक’!
‘चौक’च्या या आरारा खतरनाक ट्रेलरमध्ये प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, शुभंकर एकबोटे, अक्षय टंकसाळे, संस्कृती बालगुडे, स्नेहल तरडे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर, सुरेश विश्वकर्मा यांच्यासह बालकलाकार अरित्रा देवेंद्र गायकवाड अशी तगडी स्टारकास्ट आपल्या भेटीला येणार आहे. याशिवाय दिग्दर्शक देवेंद्र अरूण गायकवाड यांची ‘चौक’ चित्रपटात साकारलेली विशेष भूमिका या चित्रपटाची उजवी बाजू ठरेल. सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर तुफान व्हायरल होत आहे आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.
‘चौक’ चित्रपटाची निर्मिती अनुराधा प्रॉडक्शन्सच्या दिलीप लालासाहेब पाटील (तात्या) यांनी केली असून, प्रोजेक्ट व प्रॉडक्शन हेड महावीर होरे आहेत. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देवेंद्र गायकवाड यांनी केले आहे. याआधी त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील लाभलेल्या देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, बबन, रेगे, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, हिंदीतील तान्हाजी या सर्वोत्तम कलाकृतींमध्ये परिणामकारक भूमिका साकारल्या आहेत. यामुळे आता दिग्दर्शनात ते काय जादू करतात हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘चौक’ हा चित्रपट येत्या १९ मे २०२३ रोजी राज्यभरात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे प्रत्येक चौकातील पब्लिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.
Discussion about this post