Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुरेल गायकांनो संधी चुकवू नका.; मुंबईत ‘या’ दिवशी होणार ‘इंडियन आयडॉल 13’साठी ऑडिशन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 21, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Indian Idol
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अत्यंत लोकप्रिय सिंगिंग रिऍलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ पुन्हा एकदा सुरांच्या मैफिलीत आपल्याला घेऊन जायला सज्ज होत आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील हा शो प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी आहे. या कार्यक्रमातील स्पर्धक हे आपल्या सुरेल आवाजाने नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करताना दिसतात. अलीकडेच इंडियन आयडॉलचे १२ वे पर्व संपलं आणि आता प्रेक्षकांना वेध लागलेत ते १३ व्या सिजनचे. तर गायकांनो तयार व्हा. कारण आता १३ वा सीजन लवकरच येतोय आणि त्यासाठी ऑडिशन सुरु झाले आहेत. मुंबईकर चल लवकर..

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

इंडियन आयडॉल हा भारतीय टेलिव्हिजनवरील अत्यंत लोकप्रिय आणि नामांकित कार्यक्रमांपैकीं एक आहे. या कार्यक्रमाने २००२ सालापासून गायकीतले अनेक हीरे इंडस्ट्रीला दिले आहेत. गेल्या सिजनमधील पवनदीप राजन आणि अरुणित कांजीलाल हे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. यानंतर आता १३व्या पर्वाचे ऑडिशन सुरू झाले आहे. तर मुंबईत येत्या २४ जुलै २०२२ रोजी ऑडिशन होणार आहेत. नाहर इंटरनॅशनल स्कूल, नाहर्स अमृत शक्ती कॉम्प्लेक्स, चांदिवली फार्म रोड, ऑफ साकी विहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००७२ येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून ऑडिशन सुरू होणार आहेत. मुख्य म्हणजे जयपूर, भुवनेश्वर, गुवाहाटी, पटणा, कोलकाता, इंदूर आणि लखनौनंतर या वाहिनीने देशातील आणखी काही शहरांमध्ये ऑडिशन्स घेण्याचे योजले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

या ऑडिशन्सबद्दल इंडियन आयडॉल १२ चा विजेता पवनदीप राजन याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला कि, ‘मला पहिल्यापासून गायक व्हायचे होते आणि मी अगदी २ वर्षांचा असल्यापासून तबला वाजवत होतो. इंडियन आयडॉलने माझे स्वप्न साकार केले. या शोमध्ये असताना मी खूप काही शिकलो. ऑडिशन दरम्यान माझ्या आधी सवाई भट्टने ऑडिशन दिली होती. असे दर्जेदार गायक असताना मी इथवर पोहोचू शकेन असं मला वाटलंच नव्हतं. ऑडिशन फेरीपासून ते विजेता होईपर्यंत इंडियन आयडॉल या मंचाने मला नेहमीच सुखद धक्के दिले. आज मी जे काही आहे ते या मंचामुळे आहे. तुम्हीही ऑडिशन नक्की द्या..कारण यंदाचे दावेदार तुम्हीही असू शकता!’

Tags: Audition CallIndian Idol 13Instagram PostSony TVViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group