Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

त्याने मला लग्न करून फसवलंय..;आविष्कार दारव्हेकरच्या पत्नीचा सोशल मीडियावर टाहो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 16, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Avishkar Darwhekar
0
SHARES
37
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता अविष्कार दारव्हेकर सध्या त्याच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने अनेक मालिका, सिनेमांत काम केलं पण तो काही फारसा यशस्वी आणि म्हणावा तसा चर्चेत आला नाही. यानंतर मराठी बिग बॉसमध्ये आल्यापासून तो आणि त्याची पूर्व पत्नी स्नेहा वाघ हे प्रकरण गाजलं. स्नेहाने त्याच्यावर लावलेला कौटुंबिक अत्याचाराचा गंभीर आरोप आणि त्यानंतर नवंनवं लग्न केलं असताच सोशल मीडियावर त्याच्या आणखी एका लग्नाचा खुलासा झाला आहे. हे फारच शॉकिंग असून नेटकरी देखील हडबडले आहेत.

बिग बॉसमध्ये स्नेहाने आविष्कार कसा वागायचा इथून ते घटस्फोट याबाबत अनेकदा वाच्यता केली होती. यामुळे तो चर्चेत होता. पण बिग बॉसनंतर परत आविष्कारचं नाव काही फारसं ऐकण्यात नव्हतं. यातच आता त्याने दुसरं लग्न केल्याची बातमी कानावर पडली. माहितीनुसार, त्याने स्नेहा वाघशी पहिलं लग्न केलं होतं. यानंतर आता त्याने दुसरं लग्न केलं आहे. यातच त्याच्या आणखी एका लग्नाचा सोशल मीडियावर खुलासा झाला आहे. स्मिता सावंत नामक महिलेनं सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट करत आविष्कार आपला पती असून त्याने आणखी एक लग्न करून आपल्याला फसवलं आहे असं म्हटलंय. मुख्य म्हणजे आविष्काराने फेसबुकवर केलेल्या पोस्टवरून हि महिला त्याची खरोखरच पत्नी आहे असे सिद्ध होत आहे.

स्नेहा सावंत हिने फेसबूकवर पोस्ट शेअर करत आपण आविष्कारची दुसरी पत्नी असल्याचा दावा केलाय. सोबत याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान तिने त्याच्यासोबत लग्न झाल्याचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये आविष्कार तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसतोय. या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘नमस्कार मी अवनी (स्मिता)…आविष्कारची पत्नी..आम्हाला एक ५ वर्षांचा मुलगा आहे. आविष्कारने मला ठरवून पूर्णपणे फसवलं आहे. आमचा घटस्फोट झालेला नसतानाही त्यानं या मुलीशी लग्न केलं आहे..ते ही मला कळू न देता.’

पुढे लिहिलंय कि, ‘त्या मुलीचे घरचे मला ओळखत होते. मी त्यांच्या घरी देखील गेले होते.. तरी देखील त्या मुलीच्या आणि याच्या घरच्यांनी मला पुर्णपणे आर्थिकदृष्ट्या लुटलं आहे. माझे दागिने विकले. माझ्या नावार खूप कर्ज करून ठेवलं. माझे, माझ्या आई वडिलांचे पैसे हवे तसे वापरले आणि आता त्याच्याकडे पैसे मागितले तर त्याने मला सांगितलं की कोर्टात जाऊन माग. त्याच्या घरी गेले तेव्हा मला हातापाया पडायला लावलं. तरच पैसे देईन म्हणाला. त्या मुलीला विचारलं असता ती मला उलट बोलायला लागली. मारायला धावून आले अंगावर….’ याविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र आता आविष्कार पुन्हा चर्चेत आलाय. पण हि चर्चा काही बरी नाही. त्यामुळे यावर तो काय बोलतो हे पाहणे महत्वाचे आहे.

Tags: Aavishkar DarwhekarFacebook PostSerious AllegationsViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group