Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्टँडिंग ओव्हेशनमध्ये रजनीकांत यांना 51’वा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 25, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना आज २५ ऑक्टोबर २०२१ रोजी दिल्ली येथे ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एका मोठा आनंद सोहळा मानला जात आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटसृष्टीत सर्वात मानाचा पुरस्कार समजला जातो आणि याच पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#WATCH | Superstar Rajinikanth receives the Dadasaheb Phalke Award at 67th National Film Awards ceremony in Delhi. pic.twitter.com/3l51GaQBix

— ANI (@ANI) October 25, 2021

रजनीकांत यांनी आपला पुरस्कार ‘गुरू आणि गुरू’ के बालचंदर यांना समर्पित केला. रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. मोहनलाल-स्टारर मरक्कर: अरबिकादलिंते सिहममला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह सुशांत सिंग राजपूत याच्या छिछोरे चित्रपटालादेखील सन्मान प्राप्त झाला. तर कंगना रानौतला “मणिकर्णिका” आणि “पंगा” साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. धनुष आणि मनोज बाजपेयी यांना अनुक्रमे “असुरन” आणि “भोंसले” साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

67th National Film Awards | Kangana Ranaut receives the Best Actress award for "Manikarnika" and "Panga". Dhanush and Manoj Bajpayee receive the Best Actor award for "Asuran" and "Bhonsle" respectively. pic.twitter.com/SYuiIKZKUp

— ANI (@ANI) October 25, 2021

या सोहळ्याआधी रजनीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी एका गोष्टीचे दुःख व्यक्त केले होते. मी खूप आनंदी आहे की मी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. मला हा पुरस्कार मिळेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. जेव्हा मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा मला वाईट वाटले की, केबी सर (के बालाचंदर) आपल्यात नाही.”

Superstar Rajinikanth receives the Dadasaheb Phalke Award at 67th National Film Awards ceremony in Delhi. pic.twitter.com/x8hVKuCgE0

— ANI (@ANI) October 25, 2021

एप्रिल २०२१ मध्ये, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली की सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या चार दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, कोविड – १९मुळे हा पुरस्कार सोहळा आज पार पडला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह तो दिला जातो. रजनीकांत यांना भारत सरकारने २०००मध्ये पद्मभूषण आणि २०१६मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनीदेखील सन्मानित केले आहे.

Tags: ANIDadasaheb Falke Awardsuperstar rajnikantVyankayya Naidu
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group