Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बाप’ आरेला है भिडू; ‘बॉलिवूडचे लेजेंड चार, स्क्रीनवर एकत्र धमाल करणार’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 11, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Baap
0
SHARES
155
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। येत्या काळात लवकरच बॉलिवूडचे चार दिग्गज अभिनेते एका चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रिपोर्टनुसार, विवेक चौहानच्या आगामी चित्रपटाचा नुकताच फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल हे बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीचे लेजेंड एकत्र दिसणार आहेत. हा एक ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे नाव ‘बाप’ असे असणार आहे हि चर्चा आहे. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र लवकरच याची घोषणा केली जाईल.

View this post on Instagram

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu)

गेल्या काही महिन्यात बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या ‘चूप’ या चित्रपटामुळे चर्चेत राहिला. यानंतर आता सनी देओल त्याच्या खास जिगरी ३ दोस्तांसोबत आणखी एका चित्रपटातून आपल्या भेटीस येण्यास सज्ज आहे. साधारण ८०-९०च्या दशकातील सुपरस्टार म्हणून यांची ओळख आहे. हे कलाकार दुसरे तिसरे कुणी नसून सनी देओलसह, आपला भिडू म्हणजेच जॅकी श्रॉफ, बाबा म्हणजेच संजय दत्त आणि दादा म्हणजेच मिथुन चक्रवर्ती हे आहेत. या चारही कलाकारांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत काम केले आहे. यांनतर आता बऱ्याच काळानंतर ते पुन्हा एकत्र स्क्रीन गाजवणार आहेत. या चित्रपटात जॅकी श्रॉफ- जय किशन, संजय दत्त- बल्लू, सनी देओल- अर्जुन, मिथुन चक्रवर्ती- येडा भगत नामक भूमिका साकारत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

या आगामी चित्रपटाचे पोस्टर चारही कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. हा फर्स्ट लुक शेअर करताना संजय दत्तने लिहिले की, ‘सर्व चित्रपटांचा बाप. धमाल शूट, दोस्ती बेजोड.’ या पोस्टरमध्ये हे चौघेही कमालीचे हटके लूकमध्ये दिसत आहेत. मिथुन चक्रवर्ती यांच्या लूकबद्दल बोलायचे तर, त्यांनी हाफ स्लीव्ह लेदर जॅकेट घातले आहे. सोबत डोक्यावर कॅप, कपाळावर टिळा आणि गळ्यात मफलर आहे. तर दुसरीकडे, सनी देओलने केशरी आणि पांढरा कैदी ड्रेस परिधान केला आहे. सोबत त्याचे लांब केस असून कपाळावर पांढरी पट्टी आहे. संजय दत्तच्या लुकबद्दल बोलायचे झाले तर, त्याने तपकिरी रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाचा टी-शर्ट, जीन्स परिधान केली आहे. तर जॅकी श्रॉफच्या गळ्यात स्कार्फ आहे. कडक लूक आणि लक्षवेधी पोस्टमुळे आता प्रेक्षकांचीही उत्सुकता वाढली आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieJacky ShroffMithun Chakrabortysanjay duttsunny deolviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group