Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पनामा पेपर्स प्रकरणी बच्चन कुटुंब अडचणीत; ऐश्वर्यानंतर अमिताभ यांनाही ED’कडून समन्स बजावण्याची तयारी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 20, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडस्ट्रीतील नामांकित कुटुंब बच्चन कुटुंबाचे नाव पनामा पेपर्स प्रकरणात आल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. तब्बल दोन समन्सनंतर बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन आज दिल्लीतील ED कार्यालयात हजर झाली आहे. यापूर्वी दोन वेळा ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलावले होते. पण दोन्ही वेळा ऐश्वर्याने ED समोर हजर राहणे टाळले. याआधी अमिताभ यांचा मुलगा आणि ऐश्वर्याचे पती अभिनेता अभिषेक बच्चन यालाही समन्स बजावण्यात आले होते. यानंतर आता लवकरच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही ED समन्स बजावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तासहितयारी देखील ED च्या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.

Delhi | Aishwarya Rai Bachchan appears before the Enforcement Directorate in the Panama Papers case

(file photo) pic.twitter.com/LjpXyN0Ivp

— ANI (@ANI) December 20, 2021

मीडिया रिपोर्टनुसार, पनामा पेपर्स प्रकरण हे गेल्या अनेक वर्षांपूर्वी प्रचंड गाजलेले प्रकरण आहे. या केसचा दीर्घकाळापासून तपास सुरू आहे. यूकेमध्ये २०१६ साली पनामा-आधारित लॉ फर्मचे ११.५ कोटी कर दस्तऐवज लीक झाले होते. यामध्ये संपूर्ण जगभरातील मोठे नेते, उद्योगपती आणि कलाकार, खेळाडू आणि इतर मोठमोठ्या नामांकित व्यक्तींची नावे समोर आली होती. यात बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे. लीक झालेलय दस्तऐवजात सुमारे १२००० कागदपत्रांचा भारतीयांशी संबंधित आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

या केसमध्ये अमिताभ बच्चन यांना ४ कंपन्यांचे संचालक बनविले होते. यापैकी ३ बहामामध्ये, १ व्हर्जिन आयलंडमध्ये आहे. साल १९९३ मध्ये या कंपन्या तयार केल्या होत्या. यासाठी भांडवल ५ हजार ते ५० हजार डॉलर्स इतके होते. यानंतर २००५ साली बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्याला एका कंपनीचं संचालक बनवलं. या कंपनीचं नाव अमिक पार्टनर्स प्राय. लिमिटेड होतं. या कंपनीचे मुख्यालय व्हर्जिन आयलंडध्ये होते. दरम्यान ऐश्वर्या कंपनीची शेअर होल्डर बनली. यात वडील, आई आणि भाऊदेखील भागीदार होते. ही कंपनी २००५ साली स्थापन होऊन ३ वर्षांनी २००८ मध्ये बंद पडली. यानंतर अमिताभ याना विचारले असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र ED कडून केसच्या तपासाला आलेला वेग पाहता लवकरच अमिताभ बच्चनदेखील ED च्या समन्स ला सामोरे जातील अशी शक्यता नाकारता येत नाही.

Tags: Aditya Raiaishwarya rai bacchanED SummonsEnforcement DirectorateL. K. RaiPanama Papers CaseSeema Rai
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group