हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॅडमिंटनच्या जगात देशाचे नाव रोशन करणारी सायना नेहवाल यांच्या जीवनावर एक चित्रपट तयार करण्यात येत आहे. या चित्रपटात परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत आहे. परिणीती या चित्रपटासाठी खूप परिश्रम घेत आहेत. परिणीती खेळाचे बारीक मुद्दे समजून घेत आहे जेणेकरुन तीच्या अभिनयात काही कमतरता भासू नये.
सायनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. परिणीतीला सेम तिच्या स्टाईलमध्ये दिसल्याबद्दल अभिनंदन केले. खर तर यापूर्वी ही भूमिका श्रद्धा कपूर साकारणार होती पण तिने हा चित्रपट सोडल्यानंतर परिणीती या भूमिकेसाठी सूट होत आहे. फोटो शेअर करताना सायनाने लिहिले, “माझ्यासारख्या परिणीती चोप्रा. तू खूप छान दिसत आहेस.”
या चित्रपटासाठी परिणीती चोप्रा एका जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घेत आहे. या चित्रपटात सायनाचा खेळ आणि प्रत्येक सामना दाखविण्यात येणार आहे. परिणीती म्हणाली की कोणत्याही कठीण फटक्यासाठी ती बॉडी डबल चा वापर करणार नाही. परिणीतीच्या खांद्यालाही या चित्रपटादरम्यान दुखापत झाली होती. पण वेळोवेळी परिणीती चित्रपटाच्या शूटची काही छायाचित्रे शेअर करत राहिली आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनी केली आहे. याचे दिग्दर्शन अमोल गुप्ते यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’