Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अखेर जामीन मिळालाच; २५ दिवसांच्या कोठडीनंतर आर्यन खानसह, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचालाही हाय कोर्टाचा दिलासा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 28, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉर्टेलिया क्रुझवर NCB छाप्यादरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना अटक केली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान प्रकरण देशाच्या आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात व राजकारणाच्या केंद्र स्थानी गोल गोल घुमताना दिसत आहे. यानंतर राजकीय आणि बॉलिवूड मधून आर्यन खानच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येताना दिसल्या. या सर्व प्रकरण दरम्यान आर्यन खानच्या जामीन याचिकेवर वारंवार नाराजीचे सत्र पाहायला. परंतु नुकत्याच पार पडलेल्या सुनावणी दरम्यान आर्यन खानला हाय कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. यासह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचाही जामीन मंजूर झाला आहे.

Bombay High Court grants bail to Aryan Khan in drugs-on-cruise case pic.twitter.com/MerVWcfpYZ

— ANI (@ANI) October 28, 2021

मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात जामीन याचिकेची सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर उर्वरित सुनावणी काल पार पडली. दरम्यान आर्यनतर्फे युक्तिवाद मंगळवारी पूर्ण झाला. तर काल अरबाझ व मुनमून यांच्यासाठीचा युक्तिवाद पूर्ण झाला. दरम्यान NCBच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, अखेर आज आर्यन खानसह अरबाझ आणि मुनमुन यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाच.

Bombay High Court also grants bail to Arbaz Merchant and Munmum Dhamecha in drugs-on-cruise case

— ANI (@ANI) October 28, 2021

युक्तिवादादरम्यान NCBच्या वकिलांनी आर्यन खान हा ड्रग्जचा नियमित ग्राहक आहे आणि तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे सिद्ध करणारे पुरावे आमच्याकडे आहेत. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही, मात्र तो कटाचा भाग आहे. त्यामुळे कटकारस्थानचा प्रकार असल्यास कलम ३७ लागू होते आणि कटकरस्थानचे कलम २९ लागू झाले की गुन्हा गंभीर होतो. अरबाजकडे ड्रग्ज आहेत हे त्याला माहिती होते. दरम्यान आर्यन – अरबाज एकत्र खोलीत राहत होते. आर्यन ड्रग्ज पेडलर्सच्या संपर्कात होता. आर्यन आता नव्हे तर बऱ्याच वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करतोय.

Bombay HC has granted bail to Aryan Khan, Arbaz Merchant, Munmun Dhamecha after hearing the arguments for 3 days. The detailed order will be given tomorrow. Hopefully, all they will come out of the jail by tomorrow or Saturday: Former AG Mukul Rohatgi, who represented Aryan Khan pic.twitter.com/jQGKYIBxrn

— ANI (@ANI) October 28, 2021

पुढे, आरोपींचे वकील युक्तिवाद करताना म्हणाले, रक्त तपासणी झालीच नाही. तपासणी का करायला हवी होती. यावर NCBचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी महत्वपूर्ण युक्तिवाद मांडत म्हटले कि, त्यांनी सेवन केले, असे आमचे म्हणणेच नाही. त्यांनी जाणीवपूर्वक अमली पदार्थ बाळगले होते, असा आमचा आरोप आहे. अमलीपदार्थ सेवनाचा प्रयत्न केला नसला आणि जाणीवपूर्वक बाळगले असले तरी एनडीपीएस कायद्याचे कलम २८ लागू होते. तसेच कलम ८ (सी) ची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे सेवन केले नसले आणि बाळगले तरी ते कलम लागू होते. आर्यन आणि अरबाझमध्ये झालेल्या व्हॉट्सॲप संभाषणातून समजते कि, ते तिथं ‘खूप मजा’ (ब्लास्ट) करणार होते. अरबाझनं स्वत:हून त्याच्या बुटात लपवलेलं ड्रग्ज काढून एनसीबी अधिका-याला दिले.

They (Aryan Khan, Arbaz Merchant & Munmum Dhamecha) will come of the jail after the order is released from the court… For me, it is a regular case – to win some, to lose some. I am happy that he (Khan) has got bail: Former AG Mukul Rohatgi, who represented Khan in Bombay HC pic.twitter.com/UorRf4qmx0

— ANI (@ANI) October 28, 2021

दरम्यान जामिनाबाबतचे सविस्तर आदेश उद्या येणार आहेत. त्यामुळे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा याना उद्या किंवा परवा कोठडीतून बाहेर पडता येईल. तसेच जामीन मिळाला याचा अर्थ सुटका झाली असा नसून त्यांना काही नियमांचे कडक पालन करणे बंधनकारक राहील. यात प्रामुख्याने जामीन मंजूर झालेल्या कोणत्याही संबंधिताला देश सोडता येणार नाही याचा उल्लेख आहे. तसेच प्रत्येक शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक राहील. पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही

आर्यन खानच्या जामिनावर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सध्या समीर वानखेडे वेगळ्याच तणावातून जात असल्याचे दिसत आहे. आर्यन खानची कोठडी ते समीर वानखेडे यांचे धर्मांतर आणि यावर सुरु असलेले राजकारण यामुळे मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण काही वेगळेच वळण घेते का काय? अशी एक विचित्र शंका उपस्थित केली जात आहे.

Tags: Arbaaz merchantAryan KhanBail GrantedMumbai High CourtMunmun DhamechaNCBNCB Zonal OfficerSameer WankhedeShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group