हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय अध्यात्मिक मालिका म्हणजे ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’. या मालिकेतून प्रेक्षकांना संत बाळूमामांच्या लहानपण, किशोर वय, तारुण्य आणि वृद्धावस्थेतील विविध गाथांची माहिती झाली. हि मालिका गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. यानंतर आज या मालिकेने तब्बल १२०० एपिसोड पूर्ण केले आहेत. हि बाब या मालिकेच्या संपूर्ण टीमसाठी फार मोठ्या यशाची आहे. म्हणूनच मालिकेतील मुख्यपात्र बाळूमामा साकारणारा अभिनेता सुमित पुसावळे याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. सोबत सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर केले आहेत.
अभिनेता सुमित पुसावळे याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. सेलिब्रेशनच्या फोटोंसह त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि ‘१२०० एपिसोड चांगभलं.. बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेचे काल 1200 एपिसोड पूर्ण झाले. मालिकेचे निर्माते श्री. संतोष आयाचित सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन! थँक्स टु @colorsmarathi. काल सेलेब्रेशन करताना या मालिकेने इथपर्यंत केलेला प्रवास आठवला, माझे सगळेच सहकालाकार, तंत्रज्ञ मंडळी, सर्व ज्युनिअर्स, या मालिकेशी कुठल्या न कुठल्या कारणाने जोडली गेलेला प्रत्येक व्यक्ती तुम्हा सर्वांच अभिनंदन आणि आभार.. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आज मालिकेने खुप मोठा टप्पा पार केला आहे. तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं ही आभार ज्यांनी ह्या मालिकेवर विश्वास दाखवला, या मालिकेवर प्रेम केलत आणि त्यामुळेच हे शक्य झालय. मालिकेवर आणि मालिकेतल्या प्रत्येक कलाकारावर तुम्हा मायबाप प्रेक्षकांच असच प्रेम राहूद्या.. बाळूमामाचा आशीर्वाद आणि कृपा अशीच या मालिकेवर सदैव राहो हीच प्रार्थना..’
संत बाळूमामा यांच्या जीवनावर आधारित या मालिकेने १२०० भागांचा टप्पा पार केला असून हि मालिका अंतिम टप्प्याकडे येऊन पोहोचली आहे. या मालिकेची लोकप्रियता बघता बघता इतकी वाढली कि बस्स.. अभिनेता सुमित पुसावळे ज्या ज्या कार्यक्रमांना उपस्थित राही लोक त्याला बाळूमामा म्हणून संबोधताना दिसतात. या मालिकेमुळे दक्षिण महाराष्ट्राचं दैवत असणारे बाळूमामा आज तमाम महाराष्ट्राचे आराध्य झाले आहेत. बाळूमामांच्या चरित्र ग्रंथातील त्यांच्या लीला आणि त्यांनी ज्या भक्तांचा उद्धार केला त्यांच्याविषयी बरीच सखोल माहिती देण्यात आलेली आहे. त्याचाच आधार घेऊन या मालिकैची निर्मिती करण्यात आली होती.
Discussion about this post