हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसचा १६ वा सीजन कमालीचा हिट सुरु आहे. अलीकडेच या घरात नव्या वर्षाचे सेलिब्रेशन एकदम जंगी करण्यात आले. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र, कॉमिक अभिनेता कृष्णा अभिषेक, करण कुंद्रा, जन्नत जुबेर, राजीव अदातिया यांनी बिग बॉसच्या घरात एंट्री करून सगळ्यांचे मनोरंजन केले. तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी स्पर्धक एमसी स्टॅनचा लाईव्ह कॉन्सर्ट झाला. यामुळे वर्षाची सुरुवात जोरदार झाली. पण या कॉन्सर्टदरम्यान दुसरीकडे शालीन आणि टिनाची वाढती जवळीक सगळ्यांनीच पाहिली. ज्यामुळे सोशल मीडियावर बवाल झाला. यावेळी तर बिग बॉसने स्वतःच या नात्यावर प्रश्न निर्माण केले आहेत. ज्यासाठी घरातील सदस्यांकडे खुल्या प्रतिक्रिया मागण्यात आल्या.
सोशल मीडिया इंस्टाग्रामच्या माध्यमातून कलर्स टीव्हीच्या अधिकृत पेजवर प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये घरातील अन्य सदस्यांनी शालीन भनोत आणि टीना दत्ता यांच्या नात्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अर्चना आणि शिवने या नात्याबाबत बोलताना सांगितले कि, एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टसाठी पब्लिक आली होती आणि त्यांना पाहून कालपर्यंत भांडणारे शालीन- टीना अचानक एकमेकांच्या जवळ आले. हे पाहून तर सगळं पब्लिकला दाखवण्यासाठी सुरु आहे असं वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यात अर्चना म्हणाली कि, ‘लोकांसमोर असं बरं वाटतंय का? इथे करा, त्यांना लाज वाटत नाही.’
याशिवाय त्यांची नवीनवी मैत्रीण प्रियंकाने सुद्धा हे नातं बिगबॉसच्या घरापुरता असून बाहेर चालणार नाही असे म्हटले आहे. यानंतर साजिद आणि अब्दू यांनीही हे नातं दिखाव्याचं म्हटले आहे. शिवाय निम्रित आणि एमसी स्टॅन यांनीसुद्धा हे नातं खोट, फेक आहे असे सांगितले. घरातील जवळपास सर्व सदस्यांच्या म्हणण्यानुसार हे नातं केवळ शोमध्ये पुढे जाण्यासाठी आहे. यात खरेपणा नाही. कालच्या एपिसोडनंतर सोशल मीडियावर शालीन आणि टिनामध्ये अचानक निर्माण झालेल्या जवळीकवर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक प्रेक्षकांनी हे नातं आधीपासूनच सोयीचं आणि खोट असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी यांना लाज नाही असेही म्हटले आहे.
Discussion about this post