Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हळवेसे’! BB मराठीचा स्पर्धक अभिनेता अक्षय वाघमारेचे रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 26, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेला अभिनेता अक्षय वाघमारे हा एक ओळखीचा चेहरा आहे. यानंतर आता बिग बॉसमध्ये आल्यापासून त्याच्या नावाची मोठी चर्चा सुरु आहे. यातच आता त्याच एक नवं रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक मालिका आणि सिनेमांमधून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याचे हे पहिले वहिले रोमँटिक गाणे आहे. ‘हळवेसे’ असे या गाण्याचे नाव असून जीवन मराठे आणि निकिता पुरंदरे यांनी हे गाणे स्वरबद्ध केले आहे. तर या गाण्याचे चित्रीकरण मुळशी येथे झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. Shrinivas G. Kulkarni (@kulkarnishrinivas)

मान्सूनच्या हंगामात हे गाणे चित्रीत केली असून यासाठी उत्तम ठिकाणे निवडली होती. त्यामुळे हे गाणे नक्कीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. हळवेसे या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या या गाण्याला स्वप्नील सावंत व जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केलेय तर साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत. योगेश अनिल तावर या गाण्याचे दिग्दर्शक आणि अमोल घोडके कार्यकारी निर्माते आहेत. शिवाय राहुल झेंडे यांनी छायाचित्रण केले आहे व वैभव लमतुरे हे प्रॉडक्शन हेड आहेत.

View this post on Instagram

A post shared by Dr. Shrinivas G. Kulkarni (@kulkarnishrinivas)

श्रीनिवास कुलकर्णी व मधुसुधन कुलकर्णी यांचे हे तिसरे गाणे आहे. याआधी ‘मन हे वेडे’ व ‘सुख दुःख सारी’ हि गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती आणि या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. यानंतर हळवेसे या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल असा विश्वास निर्माते श्रीनिवास कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले कि, ‘हळवेसे’ या गाण्यासाठी नायक म्हणून अक्षय वाघमारे यांचेच नाव डोक्यात होते. मात्र नायिका सानिया निकम हिचे ‘मन हे वेडे’ गीताचे इंस्टाग्रामवर रील पाहून तिची या गाण्यासाठी निवड केली. तर या गाण्यात नायक असलेला अक्षय म्हणतो कि, ‘या गाण्याची सर्व टीम उत्साही असल्याने काम करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमँटिक गाणे आहे म्हणून या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे.’

Tags: Akshay waghmareBigg Boss Marathi 3Instagram PostMadhusudan KulkarniRomantic SongShrinivas KulkarniUpcoming Song
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group