हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदीवरील लोकप्रिय शो बिग बॉसच्या १४ व्या सिजनमधून प्रकाश झोतात आलेल्या सोनाली फोगाट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली फोगाट याना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची तब्येत बिघडली. याच दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोनाली भाजप नेत्या देखील होत्या. यामुळे राजकीय विश्वातदेखील त्यांच्या निधनावर शोककळा पसरली आहे.
भाजप नेत्या सोनाली फोगाट यांची अशी एक्झिट त्यांच्या कुटुंबियांना आणि समर्थकांना चटका लावणारी ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सोनाली यांची तब्येत अचानक बिघडली होती. अस्वस्थता जाणवू लागल्यामुळे त्या चलबिचल झाल्या होत्या. दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि इतरांना काही कळण्याआधीच त्यांनी जीव सोडला. सोनाली गोव्यामध्ये असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सोनाली एक उत्तम राजकारणी आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून कार्यरत होत्या.
राजकारणात प्रवेश करण्यापूर्वीपासून सोनाली अभिनय विश्वात कारकीर्द गाजवत होत्या. त्यांनी काही मालिकांमध्येदेखील काम केले होते. त्या टिकटॉकवर सक्रिय होत्या. यामुळे त्यांचा टिकटॉकवर मोठा चाहतावर्ग होता. त्या नित्य नियमाने टिक टॉकवर नव- नवे व्हिडीओ बनवून पोस्ट करायच्या. म्हणून त्यांना टिक टॉक स्टार असे ओळखले जायचं. यानंतर जेव्हा त्या बिग बॉसच्या १४ व्या पर्वात दिसल्या तेव्हा प्रेक्षकांसाठी त्या ओळखीच्या झाल्या. बिग बॉसच्या वादग्रस्त घरात येऊनही त्यांनी आपला मान जपला. सोनाली यांनी २०१९ साली भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी हरियाणातून कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
Discussion about this post