हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मनोरंजन करणारा आणि अत्यंत लोकप्रिय ठरलेला बिग बॉस हा शो मराठीतून चौथ्या सिजनपर्यंत पोहोचला आहे. आता बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु आहे आणि त्यात जर भांडण, तंटे, शिव्या असलं काही नसेल तर तो बिग बॉस आहे असं कसं म्हणणार..? म्हणूनच याची जराही कसर न सोडता बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनचे सगळे स्पर्धक चुरशीने भांडताना दिसत आहेत. घरातील सदस्यांमध्ये जराही वारा जाईल तर शपथ. सध्या घरात बिग बॉसने दिलेलं कार्य सुरु आहे. यामध्ये खरतर बिग बॉसने विमानतळ बनवलं आहे पण याचा कुस्तीचा आखाडा कसा बनवायचा याच फुल प्रूफ प्लॅनिंग स्पर्धकांनी बनवलं आहे.
बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु झाल्यापासून अगदी पहिल्या दिवसापासून रणशिंग फुंकल्यासारखे सगळे स्पर्धक एकमेकांना ढुश्या देत आहेत. कधी कोण कोणाला काय म्हणाले..? यावरून ते भांडतात. तर कधी तू का नाही म्हणत म्हणून भांडतात. त्यांना भांडायला काहीही कारण पुरत. सध्या घरात सुरु असलेले कार्य बिग बॉसने विमानतळ म्हणून स्पर्धकांचे सोपविले होते. ज्यामध्ये सगळ्या स्पर्धकांनी आपापल्या बॅग उचलल्या. पण अक्षय आणि प्रसाद मध्ये मात्र एकाच बॅगवरून चांगलीच जुंपली होती.
काही केल्या प्रसाद आणि अक्षय ती बॅग सोडायला तयार नव्हते. यात बाकीचे स्पर्धक कुणी आग लावत होत, कुणी तेवत होत, कुणी रॉकेल टाकत होत पण कुणीच विझवत नव्हतं. कुणी म्हणत होत कि, प्रसाद बॅग सोड कारण अक्षयने आधी घेतलेली मी बघितली. तर कुणी म्हणतंय कि याने त्याची बॅग घेतली. कुणी म्हणताय अरे मला माहितेय मी कुणाची बॅग घेतली. बापरे बाप.. या सगळ्यात बिग बॉसलाही प्रश्न पडला असेल कि मी कुणाला कोणती आणि किती बॅग दिलेल्या. आहे त्या खेळाचा विचका कसा करायचा हे बरोबर या स्पर्धकांना समजलं आहे. पण काही असो, प्रेक्षक मात्र हा खेळ चांगला एन्जॉय करत आहेत. त्यामुळे स्पर्धकहो.. ‘लगे रहो’.
Discussion about this post