हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस म्हटलं कि राडे, भांडण, शाब्दिक चकमक, आरोप प्रत्यारोप, रडारड, दोस्ती, दुष्मनी असे विविध पेहलू पहायला मिळतात. कारण हे घरच असं आहे कि इथे आलेलं प्रत्येक भांडं कधी ना कधी वाजतंच. सध्या बिग बॉस मराठीच्या चोथ्या पर्वातही असाच काहीसा खेळ सुरु आहे. पण याहीपेक्षा वेगळं काहीतरी द्यायच्या नादात चोथ्या पर्वाचे स्पर्धक सगळ्या मर्यादा विसरले आहेत. बिग बॉसने ‘खुल्ला करायचा राडा’ हे कार्य सोपवताच सगळे स्पर्धक जणू बुद्धिहीन झाले आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार प्रत्येक टास्क थोडी यारी थोरी दुष्मनी घेऊन येतो. अनेकदा टास्क दरम्यान भांडणं होतात. अगदी मारामारीसुद्धा होते हे आपण जाणतोच. दिलेला टास्क जिंकण्यासाठी स्पर्धक कोणत्याही थराला जायची तयारी ठेवतात. पण यावेळी घरात चक्क उकळतं तेल, मिरचीची धुरी, पाणी, कचरा अशा वस्तूंचा वापर करून सदस्यांनी तर माणुसकी या शब्दाची किंमत शून्य केली आहे. बिग बॉसने स्पर्धकांना ‘खुल्ला करायचा राडा’ हे कार्य पार पाडायला सांगितले होते. पण यामध्ये युक्त्या क्लुप्त्या वापरायच्या नादात या स्पर्धकांनी एकाच दोन करून ठेवलं.
‘खुल्ला करायचा राडा’ या कार्यामध्ये घरातील दोन स्पर्धकांना सी- सॉवर बसायचे आहे आणि घरातील इतर स्पर्धकांनी त्यांना यावरुन उठवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. हा टास्क फक्त इतकाच होता. या टास्कसाठी प्रत्येकाने युक्तीचा वापर करणे अपेक्षित होते. पण या टास्कमध्ये स्पर्धकांनी जिंकण्याच्या नादात सगळ्याच गोष्टींचे सीमोल्लंघन केले आहे. काहींनी सी- सॉवर बसलेल्या स्पर्धकांना उठवण्यासाठी गरम तेलाचा वापर केला तर काहींनी कचरा टाकला, मिरचीची धुरी दिली. यावेळी वाईल्ड कार्ड म्हणून आलेल्या स्नेहलता वसईकरवर स्पर्धक तुटून पडल्याचे दिसले. व्हायरल प्रोमो पाहून स्पर्धकांनी मानसिकता बिघडली आहे का असा अनेक नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
 
	
					
		
		
		
    
    
     
			
 
                                     
            
Discussion about this post