हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या घरात कशाहीपेक्षा जास्त महत्वाची आहे ती म्हणजे कॅप्टन्सी. त्यात जास्त अंतिम टप्पा असेल तर कॅप्टन्सीसाठी कुणीही काहीही करायला तयारच असतं. याचा उत्तम प्रत्यय नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात आला. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाने जवळपास ८८ ते ८९ दिवस पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता शोचे फार दिवस राहिलेले नाहीत आणि अशावेळी जर कॅप्टन्सी समोर असेल तर स्पर्धक त्यासाठी काहीही करायला तयार असणे स्वाभाविक आहे. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कच्या एका ट्विस्टने विजेत्याचे १७ लाखांचे नुकसान केले आहे. ते कसे हे जाणून घेऊया.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची शेवटची कॅप्टन्सी मिळवण्यासाठी घरातील सदस्यांनी पूर्ण प्रयत्न केले. यावेळी विजेत्याला मिळणाऱ्या बक्षीसाच्या मोठ्या रकमेवर पाणी सोडवे लागणार असल्याचे त्याना सांगण्यात आले होते. मुख्य म्हणजे ‘बिग बॉसच्या मराठी’च्या चौथ्या पर्वाच्या विजेत्याला ट्रॉफी आणि २५ लाख रुपये इतके रक्कम बक्षीस म्हणून मिळणार होते. मात्र शेवटच्या कॅप्टन्सीने विजेत्यांचे मोठे नुकसान केले आहे. या कॅप्टन्सी टास्कदरम्यान बक्षिसाची रक्कम हि अर्ध्याहून कमी झाली आहे. या टास्कमध्ये प्रत्येक सदस्याच्या नावाची पाटी ज्याच्या त्याच्या गळ्यात अडकवण्यात आली आणि सांगण्यात आले कि दर दहा सेकंदाला बक्षिसाच्या रकमेतून ५० हजार कमी होणार आहेत. यावेळी कॅप्टन की बक्षिसाची रक्कम यातील एक पर्याय सदस्यांना निवडायचा होता.
या टास्कमध्ये सदस्यांनी बझर वाजवून कॅप्टन्सी कार्यातून माघार घेऊन बक्षिसाची रक्कम कायम ठेवायची होती. दरम्यान टास्क सुरू झाल्यानंतर २० सेकंदांनी २४ लाख रक्कम वाचवत अक्षय केळकरने कॅप्टन्सी कार्यातून माघार घेतली आणि आपल्या नावाची पाटी एटीएम मशिनमध्ये टाकली. पुढच्या १० सेकंदात किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांनीही कॅप्टन्सी कार्यातून माघार घेतली. यानंतर आरोह आणि प्रसादमध्ये कॅप्टन्सीतून माघार घेण्यावर वाद सुरु झाले. जेव्हा बक्षिसाची रक्कम आठ लाखावर आली तेव्हा प्रसादसुद्धा कॅप्टन्सी कार्यातून बाहेर पडला. पुढच्या १० सेकंदात अमृता धोंगडेनेसुद्धा माघार घेतली आणि शेवटी कॅप्टन्सी कार्यात आरोह विजयी ठरल्यामुळे तो या सीजनचा शेवटचा कॅप्टन ठरला. पण झालं असं कि, आता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा जो कुणी विजेता होईल त्याला ट्रॉफी आणि फक्त ८ लाख रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे.
Discussion about this post