हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये चॅलेंजर्स आल्यापासून एक वेगळीच मजा आणि घरात एक वेगळीच एनर्जी पहायला मिळते आहे. या चॅलेंजर्समध्ये राखी सावंत, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि विशाल निकमने घरात एंट्री केली आहे. यानंतर नुसता राडा राडा आणि फक्त राडा सुरु आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात एकदम हटके असा वेगळाच कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. या कॅप्टनसी कार्यात सगळेच स्पर्धक धमाकेदार परफॉर्मन्स देऊन चेलेंजर्सचं मन जिंकणार आहेत. दरम्यान राखीने असा काही परफॉर्मन्स केलाय कि सगळ्यांच्या काळजात तिनं वार केलाय आणि माहोल एकदम गार गार केलाय.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात आज धमाकेदार कॅप्टनसी टास्क होणार आहे. हा टास्क सो मच गंभीर पण अत्यंत गमतीशीर असा आहे. कारण कॅप्टन्सीसाठी पहिल्यांदाच असा टास्क बिग बॉसने दिलाय. कॅप्टनसी कार्य म्हणजे डोक्यावर टेन्शन आणि फुल्ल राडा. पण यावेळी तर हे कार्य खूप आनंद घेऊन येत आहे. या कार्यात प्रत्येकाला हटके डान्स परफॉर्मन्स द्यायचा आहे. ज्याचे सादरीकरण चार बॉसना म्हणजे राखी, मीरा, आरोह, विशाल यांना आवडेल तो होणार घराचा नवा नवा कॅप्टन.
यावेळी दमदार सादरीकरणानंतर राखीने अमृता धोंगडे आणि विशाल निकमला ‘खूप छान झालं, जे तुमच्या मनात होतं ते दिसलं’ अशा कमेंटने चार चाँद लावले. पुढे ‘कोणीही म्हणून शकत नाही की तुम्ही एकदा गाणं ऐकून हा डान्स बसवला आहे… स्टेजवर आग लावली.’ असही म्हणाली.
याशिवाय किरण, अपूर्वा आणि विकास यांचा परफॉर्मन्स सगळ्यांनी एन्जॉय केला. यानंतर आरोह वेलणकर आणि राखीचा डान्स पाहून विकास सावंत म्हणाला, ‘एक नंबर झाला…तू सावंत या नावाला मोठं केलंयस.. माझ्याकडे शब्द नाहीत.’ यानंतर किरण माने म्हणाले, ‘राखी सावंतला लाईव्ह डान्स करताना बघणं म्हणजे काय सांगू…’ बोलताना किरण मानेंनी राखी आणि किरण असा उल्लेख केला आणि सगळेच हसू लागले. त्यावर आरोह म्हणाला, ‘आता खरं बाहेर आलं, बिग बॉस जोडी चुकली आहे…’ मग उभे किरण म्हणाला, ‘आरोहने त्याच्या नावाप्रमाणे जो चढता स्वर दाखवला, फार सुंदर… राखी एकंच सांगतो तू बिग बॉस मराठी सिझन ४ मध्ये आल्यापासून ते होतंच आहे पण या डान्स नंतर भन्नाट, जबराट, नादखुळा, पाण्यात आग…’ अशाप्रकारे राखीच्या परफॉर्मन्सने घरात धुमशान घातलं.
Discussion about this post