Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘BIGG BOSS’च्या घरात गेले, गोड नातं तोडून आले’; रुचिरा- रोहितच्या नात्याला पूर्णविराम..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 10, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rohit_Ruchira
0
SHARES
7.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी 4’ मध्ये अभिनेत्री रुचिरा जाधव आणि डॉ.रोहित शिंदे हे खऱ्या खुऱ्या आयुष्यातलं गोड जोडपं आनंदाने घाट एंटर झालं होत. पण पहिल्यांदाच असं झालाय कि, रिअल लाईफ कपल या घरात गेलं आणि त्यांचं खरंखुरं नातं इथे तुटलं. बिग बॉसच्या घरात त्यांच्यामध्ये अशा काही गोष्टी घडल्या कि ज्यामुळे त्यांच्यात फार दुरावा निर्माण झाला आहे. दोघांमध्ये अनेक गैरसमज झाले आणि एक मोठी दरी निर्माण झाली. घरातून बाहेर येऊन शो संपल्यावर त्यांचं नातं पुन्हा एक संधी घेऊन पुढे जाईल असे सगळ्यांना वाटले होते पण तसे काही होईल याची आशा आता राहिली नाही. रुचिराच्या पोस्टने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by RucHira Jadhav – Rooh (@ruchira_rj)

काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीचे सगळे सदस्य पुन्हा एकदा घरात जमले होते. यावेळी रोहित आणि रुचिरा एकाच घरात पण तरीही लांब. दरम्यान मेघा घाडगे आणि प्रसाद जवादे यांनी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. दोघांनी एकमेकांना खीर भरवली पण हे नातं परत जुळू शकलं नाही हेच खरं. रुचिराने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे यात तिने लिहिलंय कि, ‘एंड ऑफ द चाप्टर, एंड ऑफ द जर्नी, पण माझ्या आयुष्याचा इंटरव्हल पॉइंट. मला आज तुम्हा सर्वांशी एक गोष्ट शेअर करायची आहे. त्यातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. मी इंडस्ट्रीत नसताना हा शो पहायचे. फॉलो करायचे आणि स्वतः शोमध्ये जाण्याची कल्पना करायचे. माझ्या कॉलेजनंतर थिएटर, टीव्ही आणि नंतर सिनेमांचा प्रवास सुरूच आहे. अशातच मला २०२१ मध्ये बिग बॉससाठी विचारणा झाली होती. पण बहिणीच्या लग्नामुळे तेव्हा मला जमलं नाही आणि मला यंदा पुन्हा विचारण्यात आलं. पण तो ट्विस्ट होता, यंदाचा सर्वात मोठा ट्विस्ट’.

View this post on Instagram

A post shared by RucHira Jadhav – Rooh (@ruchira_rj)

पुढे लिहिलंय, ‘मी खूश होते, थोडी भीतीही होती, पण मला विश्वास होता. पण माझं वैयक्तिक आयुष्य टीव्हीवर उघड करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. हा शो माझ्यासाठी जवळचा होता. माणूस म्हणून आपण जसे असतो, तसे इथे दिसतो. खूप गोष्टी ठरवल्या होत्या, पण तशा झाल्या नाहीत. या इंडस्ट्रीत प्रत्येक संधी महत्त्वाची असते, माझ्यासाठीही होती. प्रत्येक शोनंतर वेगळा संघर्ष असतो. मी जीव ओतून शोमध्ये खेळले. जी गोष्ट मला अ‍ॅडव्हान्टेज म्हणून मिळाली होती, तीच दुर्दैवाने माझ्यासाठी डिसअ‍ॅडव्हान्टेज ठरली. ती नॅचरल राहिली असती तरी मला चाललं असतं.शो जिंकणे- हरणे हा मुद्दा नाही. मला मनासारखं खेळता न आल्याचा त्रास झाला. बदल फार जवळून पाहिलाय मी आणि त्या धक्क्यातून अजून सावरू शकलेले नाही. काही गोष्टी ठरवल्या होत्या, स्वप्न पाहिली होती आणि ती फक्त माझ्यासाठी नव्हती. शिवाय तुम्ही सगळे काय बोलता, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला कमवायला खूप वर्षे लागली आहेत’.

View this post on Instagram

A post shared by RucHira Jadhav – Rooh (@ruchira_rj)

पुढे लिहिलंय, ‘मी ज्या भावनिक टप्प्यातून जात आहे, ते मी तुम्हाला शब्दांत सांगू शकत नाही. मी एकटीच लढतेय. तुम्हाला पूर्ण गोष्टी माहीत नाही, त्यामुळे मला समजून घ्या, असं मी तुम्हाला म्हणत नाही. महिला असल्याने, पब्लिक फिगर असल्याने आणि अभिनेत्री असल्याने खूप गोष्टी बोलायच्या टाळतेय. पण कधी कधी खूप गुदमरायला होतंय, इतकंच सांगेन. तुमच्या स्वप्नांचा आदर न करणाऱ्यांसाठी तुमचं आयुष्य घालवण्यापेक्षा स्वतःवर पुन्हा एकदा विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्न जगा’.

View this post on Instagram

A post shared by RucHira Jadhav – Rooh (@ruchira_rj)

रुचिराने या पोस्टमध्ये कुठेही रोहितच्या नावाचा किंचितभरही उल्लेख केलेला नाही. पण हि पोस्ट तिने त्यांच्याच नात्यावर लिहिले आहे हे फार स्पष्ट समजते. त्यामुळे रुचिरा आणि रोहित यांच्या वाटा खरोखरच्या आयुष्यात वेगळ्या झाल्या आहेत असे दिसत आहे. पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात गेल्यामुळे एखादं नातं तुटताना लोकांनी पाहिलंय.

Tags: Bigg Boss Marathi 4 FameBreakupInstagram PostRuchira Jadhavviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group