Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या साजश्रुंगारात नाहले रुपालीचे सौंदर्य; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 25, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Rupali Bhosale
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधून अभिनेत्री रुपाली भोसलेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या मालिकेत रुपाली साकारत असलेली संजना हि भूमिका खरं तर नकारात्मक आहे. पण नकारात्मक भूमिकेलाही मन आणि भावना असतात हे या भूमिकेतून रुपालीने दाखवून दिले आहे. त्यामुळे भूमिका नकारात्मक असली तरीही प्रेक्षकांचं प्रेम मात्र सकारात्मक आहे. याशिवाय रुपाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याची एकही संधी ती सोडत नाही. सध्या तिच्या कट्यार सौंदर्याची एक हलकी झलक दाखवणारा एक व्हिडीओ तिने शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

अभिनेत्री रुपाली भोसले हिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली पिवळ्या रंगाच्या पैठणी नऊवार साडीत दिसते आहे. हा रंग रुपालीच्या सौंदर्याला सोन्यासारखी चकाकी देतो आहे. शिवाय तिने साजेसा मेकअप आणि श्रुंगार केल्यामुळे तिचा लूक आणखीच उठून आला आहे. रुपालीने गळ्यात सुंदर असा मोत्याचा नेकलेस, कानात बाली आणि चैन, नाकात नथ, हातात सुंदर बांगड्या आणि कपाळावर चंद्रकोर असा पेहराव केला आहे. अतिशय लक्षवेधी आकर्षक महाराष्ट्रीयन लूकमध्ये रुपाली फारच सुंदर दिसते आहे.

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

रुपालीने शेअर केलेल्या या व्हिडीओ पोस्टवर अनेक चाहत्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत तिच्या सौंदर्याची तारीफ केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘या लुक मध्ये खूप सुंदर दिसतेस’. तर आणखी एकाने लिहिले कि, ‘तुला पाहून महान काशीबाई बल्लाळ यांची आठवण झाली.’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, खूपच सुंदर.’

View this post on Instagram

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

अभिनेत्री रुपाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रुपाली सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजना हे नकारात्मक पात्र साकारते आहे. तिने हिंदी मालिकेतही काम केले आहे. सोनी सबवर होऊन गेलेल्या ‘बडी दूर से आए है’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती. यामध्ये तिने सुमित राघवन सोबत स्क्रीन शेअर केली होती.

Tags: Instagram PostRupali Bhosaletv actressViral PhotosViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group