हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेविश्वात खळबळ निर्माण करणारी अत्यंत धक्कादायक अशी एक घटना घडली आहे. प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी उत्तर प्रदेश येथील वाराणसीमध्ये एका हॉटेलात गळफास लावून आत्महत्या केली आहे. वयाच्या २५ व्या वर्षी अभिनेत्रीने एव्हढं मोठं टोकाचं पाऊल उचलल्याने सगळेच धक्क्यात आहेत. दरम्यान तिच्या मृत्यूबाबत सुरु तपासात २ मोठे अपडेट आले आहेत. आकांक्षाने मृत्यूआधी इंस्टा लाईव्ह केलं होत आणि यावेळी ती खुप रडत होती. हा व्हिडीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच मृत्यूपूर्वी तिला तिच्या घरी सोडण्यासाठी एक इसम आल्याची देखील नोंद आहे.
Bhojpuri actress Akanksha Dubey dies allegedly by suicide at a hotel in Varanasi, Uttar Pradesh. Details awaited.
(Pic: Akanksha Dubey's Instagram account) pic.twitter.com/Abw2oGkG7H
— ANI (@ANI) March 26, 2023
अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय..? याबाबत पोलीस तपास करत आहेत. यामध्ये इंस्टा लाईव्ह दरम्यानचा व्हिडीओ मोठा संशय निर्माण कात आहे. तसेच मृत्यूपूर्वी आदल्या रात्री आकांक्षाला घरी रात्री उशिरा सोडण्यासाठी एक व्यक्ती आला होता. जो तिच्या खोलीतसुद्धा गेला होता. या व्यक्तीवर आता संशयाची सुई सरकते आहे.
Bhojpuri actress Akanksha Dubey was staying at Hotel Saumendra in Sarnath for a film shoot. We received info that she hanged herself. We called field unit, evidence is being collected. Further action will be taken as more facts come to light. Family has been informed. Prima facie… pic.twitter.com/KBI2TFp995
— ANI (@ANI) March 26, 2023
हा व्यक्ती आकांक्षाच्या अत्यंत जवळ असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पोलिस आकांक्षाच्या मोबाईलमधून मिळणाऱ्या कॉल डिटेल्सच्या मदतीने तिच्या आत्महत्येचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री आकांक्षा दुबे शनिवारी रात्री वाढदिवसाच्या पार्टीला जात असल्याचं सांगून हॉटेलमधून बाहेर पडली होती. रात्री २ वाजण्याच्या सुमारास एक मुलगा तिला ड्रॉप करण्यासाठी आला आणि तिला सोडण्यासाठी तिच्या खोलीत गेला. हा मुलगा आकांक्षासोबत तिच्या खोलीत साधारण १७ मिनिटे होता. तो गेल्यानंतर आकांक्षाने दरवाजा उघडलाच नाही. त्यामुळे आता पोलिस या मुलाचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत. आकांक्षाला तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बोलावले होते.
Discussion about this post