Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

IPL च्या तयारीला सुरवात; खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानांसोबत ‘या’ खास सुविधा

tdadmin by tdadmin
July 18, 2020
in बातम्या
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन |आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसल्याचे आता पाहायाल मिळत आहे. कारण बीसीसीआयने आता आयपीएलच्या आयोजनाची तयारी सुरु केली आहे. यामध्ये खेळाडूंसाठी खास चार्टर्ड विमान करण्यात येणार आहे, त्याबरोबर अजून कोणत्या गोष्टी बीसीसीआय आयपीएलसाठी करत आहे, जाणून घ्या…

आयसीसीने ट्वेन्टी-२० विश्वचषक अजूनही रद्द केलेला नाही. पण दुसरीकडे मात्र बीसीसीआयने आयपीएलची तयारी कराययला सुरुवात केली आहे. या वर्षीची आयपीएल ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवणार येणार असल्याचे समजते आहे. कारण संघ मालक आता आपल्या खेळाडूंची आबुधाबी येथे कशी व्यवस्था होईल, हे पाहण्यात गुंतलेले आहेत.

सध्याच्या घडीला आयपीएल खेळवणे सोपे नसल्याचे म्हटले जात आहे. कारण प्रत्येक संघात जवळपास ३०-३५ क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर सपोर्ट स्टाफही १०-१५ जणांचा असतो. पण हे कठिण दिसत असले तरी ते अशक्य नाही, असे बीसीसीआयला वाटत आहे. त्यामुळेच आबुधाबीमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी आता बीसीसीआय आणि संघ मालकांनी प्रयत्न सुरु केले आहेत.

याबाबत एका संघाच्या फ्रँचायझी मालकांनी सांगितले की, ” आयपीएलसाठी आम्ही आबुधाबी येथे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे खेळाडूंना खास चार्टर्ड विमानाने नेले जाणार आहे. त्याचबरोबर खेळाडू प्रवास कसा करतील आणि सराव कुठे व कसा करतील, या गोष्टींचाही विचार करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला खेळाडू घरी आहेत आणि सुरक्षित आहेत. पण आबुधाबीला जाण्यापूर्वी सर्वांना आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्याचबरोबर त्यांची चाचणीही घेण्यात येणार आहे. सर्व सुरक्षेचे उपाय करूनच आम्ही खेळाडूंना आबुधाबीला घेऊन जाणार आहोत. कारण आमच्यासाठी खेळाडू सर्वात महत्वाचे आहेत. त्यामुळे खेळाडूंची काळजी आम्ही सर्वप्रथम घेणार आहोत. त्याचबरोबर आबुधाबीमध्ये जे काही सरकारचे नियम असतील तेदेखील आम्हाला पाळावे लागणार आहेत.

Tags: BCCICricketIPLIPL S13UAE
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group